



बेळगाव : श्री हनुमान जयंती उत्सव मंडळ (ट्रस्ट) संयुक्त महाराष्ट्र चौक, खडेबाजार, बेळगांव यांच्यावतीने खडेबाजार, बेळगांव संयुक्त महाराष्ट्र चौकातील जागृत देवस्थान असलेले श्री मारुती मंदिराचे नूतनीकरणनिमित्त आज शुक्रवार रोजी कळसारोहण सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा करण्यात आला.शुक्रवार सकाळी ७ ते ११ या वेळेत वासुदेव पांडुरंग छत्रे, गणेश चिंतामणी फडके, अवधूत गणेश जोशी, नागेश देशपांडे आणि चैतन्य वासुदेव छत्रे यांच्या पौरिहित्याखाली श्री हनुमान जयंती उत्सव मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष सुनील नाईक आणि स्मिता नाईक यांच्या हस्ते गणेशपूजन, श्री हनुमान मूर्तीला महाभिषेक, पुण्याहवचन, मुख्यदेवता स्थापना व नवग्रह स्थापना, होम कळस शुद्धी, हवन, पूर्णाहुती करण्यात आली. खडेबाजार नाना शंकरशेठ मार्ग) येथून कळसाची मिरवणूक करण्यात आली. मिरवणुकीच्या प्रारंभी बसवाण्णा बँड यांच्या पथकाने भक्तीगाणी वाजून मिरवणुकीमध्ये शोभा वाढवली. 25 हून अधिक सुवासिनींनी डोक्यावर कळस घेऊन मिरवणुकीमध्ये भाग घेतला होता. श्री हनुमान मंदिर समोर आल्यानंतर सोहळ्यासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे श्री स्वामी आत्मप्राणानंदजी महाराज (सचिव, रामकृष्ण मिशन आश्रम, बेळगांव) यांच्या हस्ते कळसाचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष सुनिल मधुसूदन नाईक, उपाध्यक्ष विश्वजित शंकरराव देशपांडे, सेक्रेटरी मारुती भूपाल विभुते, उपसेक्रेटरी राजेंद्र वसंतराव संपगांवकर, खजिनदार भालचंद्र गोविंदराव गाडगीळ, आणि सदस्य रवी कलघटगी, पुरोहित संजय कलघटगी, सचिन केकरे, हेमंत हावळ , राहुल कलघटगी, साई कलघटगी, विकास कलघटगी, रोहित कापाडिया, प्रसाद हावळ, अशोक पै, सुभाष इनामदार, सुधीर कार्लेकर, मनोज तेंगशे, सतीश नाईक, प्रसाद कळ्ळीमनी, सुभाष कट्टी यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी भक्तांना तीर्थप्रसाद वितरण करण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta