



कावळेवाडी : राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेला बेळगाव मधील मराठी भाषा प्रेमी नवसाहित्य पुस्तकालयाचे मालक शेषकुमार जवळकर यांनी तीनशे पुस्तके भेट दिली. महात्मा गांधी संस्थेचे अध्यक्ष वाय पी नाईक यांच्या कडे तीनशे पुस्तके भेट देऊन वाचन संस्कृती जोपासण्यासाठी सहकार्य केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी ही संस्था गेली आठ वर्षे कार्यरत आहे. महात्मा गांधी संस्थेच्या माध्यमातून प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन शिक्षक व विद्यार्थी यांच्याशी संवाद साधून मोफत पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. अशा या विधायक प्रेरणादायी उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी नवसाहित्य पुस्तकालयकडून तीनशे पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
यावेळी शिवाजी शिंदे, अनुप वैद्य उपस्थित होते.
मराठी भाषा संवर्धनासाठी श्री. जवळकर यांनी सहकार्य केल्याबद्दल उपाध्यक्ष अॅड नामदेव मोरे, सचिव सतीश जाधव, कार्याध्यक्ष पी. आर. गावडे सर्व संचालक मंडळाने समाधान व्यक्त केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta