



निपाणी (वार्ता) : देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतर १९५६ साली कर्नाटक राज्याच्या निर्मितीवेळी येथील मराठी भाषिक भाग केंद्र सरकारने अन्यायाने कर्नाटक राज्यात डांबण्यात आला. याच्या निषेधार्थ दरवर्षी रविवारी (ता.१) नोव्हेंबर हा दिवस सीमा भागातील मराठी भाषीक काळा दिन म्हणून लोकशाहीच्या माध्यमातून पाळत आहेत.
या दिवशी शहर आणि परिसरातील नागरिकांनी आपले दैनंदिन व्यवहार, व्यवसाय दुकाने, हॉटेल्स्, रिक्षा, वडाप वाहतूक छोटे व्यवसाय बंद ठेवावेत. तरी सर्व मराठी भाषिक नागरिक बंधू भगिनींनी या बंदमध्ये सहभागी होऊन हा बंद लोकशाही मार्गाने शांततेने आपला ज्वलंत मराठी बाणा दाखवावा. नुकताच कर्नाटक उच्च न्यायालयाने काळ दिन लोकशाही मार्गाने पाळणे हा मराठी भाषिकांचा हक्क आहे. असा निकाल दिल आहे.
यादिवशी मराठी भाषिकांनी एकजुटीने बंद पाळणे म्हणजे सीमाप्रश्न सोडवणूकीची नांदी ठरणार आहे.
बंदमध्ये तालुक्यातील बहुसंख्य मराठी भाषिक, शिवसेना व महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष जयराम मिरजकर यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta