Friday , November 6 2026
Breaking News

तलाठी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने बाळाप्पा घाळी यांचा हुन्नरगीत सत्कार

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : हुन्नरगी येथील बाळाप्पा घाळी यांनी तलाठी पदाच्या परीक्षेत द्वितीय क्रमांक मिळविला आहे. त्यामुळे त्यांची तलाठी पदावरनिवड झाल्याबद्दल बोरगाव येथील सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांनी मिळवलेले हे यश त्यांच्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि चिकाटीचे फलित आहे. ग्रामीण भागातील युवकांमध्ये टॅलेंट असून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे उत्तम पाटील यांनी सांगितले. हुन्नरगी ग्रामपंचायतची माजी अध्यक्ष महांतेश पाटील, वृषभ चौगुले, अमर स्वामी, प्रमोद पाटील, सिदनाळ येथील माजी ग्रामपंचायत अध्यक्ष पोपट मगदूम पिंटू जमादार, आशिष खोत, दादासाहेब किल्लेदार, वासू गोरडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, अरिहंत बँकेचे संचालक आणि युवक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत निपाणीच्या रतिक लाखेचे दुहेरी यश

Spread the love  निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्यस्तरीय शरीरसौष्ठव (बॉडीबिल्डिंग) स्पर्धांमध्ये निपाणी येथील‌ रुतिक लाखे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *