Friday , November 6 2026
Breaking News

निकु पाटील हल्ला प्रकरणाचा गांभीर्याने चौकशीची माजी नगरसेवक संघटनेची मागणी

Spread the love

 

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील टाऊन प्लॅनिंगचे अध्यक्ष संयोजित उर्फ निकु पाटील यांच्यावर प्लॉटिंगच्या वादातून झालेल्या हल्ल्याचा येथील माजी नगरसेवक संघटनेतर्फे निषेध करण्यात आला. शिवाय या घटनेचा गांभीर्याने तपास करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आले.
शहरात बिल्डर संस्कृती वाढत असून त्यामध्ये सर्वसामान्य नागरिक भरडला जात आहेत. बिल्डरांना कायद्याचा धाक राहिला नसून आपण करील ती पूर्व दिशा अशी त्यांची वागणूक आहे. त्यामुळे शहर आणि उपनगरातील शांतता, सलोखा, व एकोपा टिकवण्यासाठी अशा प्रवृत्ती विरुद्ध कायद्याचा बडगा दाखवण्याची गरज आहे. याबाबत कृती करण्याची मागणी करत बसवेश्वर पोलीस स्थानकाचे निरीक्षक रमेश पवार यांची माजी नगरसेवकांनी भेट घेऊन निवेदन सादर केले.
यावेळी निपाणी टाऊन प्लॅनिंगचे अध्यक्ष निकु पाटील, माजी नगराध्यक्ष विजय शेटके, चंद्रकांत जासूद, माजी सभापती अल्लाबक्ष बागवान, किरण कोकरे, माजी नगरसेवक सुभाष कांबळे, धनाजी निर्मळे, रियाज बागवान, अशोक लाखे, दीपक ढणाल, युवराज पोळ, जीवन घस्ते, किसन दावणे, शामराव पुंडे, प्रवीण हेगडे, राजू पाटील, प्रथमेश जासूद उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत निपाणीच्या रतिक लाखेचे दुहेरी यश

Spread the love  निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्यस्तरीय शरीरसौष्ठव (बॉडीबिल्डिंग) स्पर्धांमध्ये निपाणी येथील‌ रुतिक लाखे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *