



निपाणी (वार्ता) : ऊसाला योग्य दर देण्यासाठी शासन आणि कारखानदार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केवळ आश्वासन देत आहेत. त्यामुळे गल्लीपासून बेंगलोर पर्यंत मोर्चा आंदोलने व निवेदन देऊनही त्याकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे शनिवारी (ता.३१) दिवसभर गावागावात बंद करून वाहने अडविण्यात आली. भोज, नेज, नेज क्रॉस येथे रस्त्यावर विविध शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलन करून वाहतूक बंद पडली.
परिसरातील सर्वच गावांमध्ये सकाळपासूनच रमेश पाटील शितल कागे आणि कार्यकर्त्यांनी पदयात्रा काढून किराणा, कापड, सोने, चांदी, खत विक्री केंद्र, विविध बँका बंद ठेवण्याचे आवाहन केले. त्याला सर्वच व्यवसायिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याने बंद यशस्वी झाला. त्यानंतर भोज ग्रामपंचायत तलाठी एम. ए. सनदी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी शिवगोंडा पाटील, विद्याधर नेजे, प्रकाश गेबीसे, श्रीधर चौगुले, संजय माळी, सिद्धार्थ नाईक, बापू हंपनावर यांच्यासह विविध शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta