Sunday , September 20 2026
Breaking News

बेळगाव

मालमत्तेच्या वादातून बाप-लेकीची ग्राम पंचायत आवारात निर्घृण हत्या

  कित्तूर तालुक्यातील आवरादी गावातील थरारक घटना; कारचालक गंभीर जखमी बेळगाव : मालमत्तेच्या वाटणीवरून कुटुंबात सुरू असलेल्या वादाचा शेवट बुधवारी बाप-लेकीच्या निर्घृण हत्येत झाला. कित्तूर तालुक्यातील आवरादी गावातील ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात माजी सैनिक रुद्राप्पा कुंदरगी (६७) आणि त्यांची मुलगी शशिकला कुंदरगी (२६) यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करून त्यांची हत्या करण्यात …

Read More »

चव्हाट गल्ली अग्निकांड : उपचारादरम्यान बापलेकाचाही मृत्यू

  बेळगाव : शहरातील चव्हाट गल्ली परिसरातील ढोरवाडा येथे गणेश चतुर्थीच्या मध्यरात्री घडलेल्या भीषण अग्निकांडाने शहर हादरले आहे. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चौघींचा जिवंत जळून मृत्यू झाल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या गजानन धमुने (६५) आणि त्यांचा मुलगा रोशन धमुने (२१) यांचाही आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा सहावर …

Read More »

रयत गल्लीत घरगुती गणेश देखाव्यांची पर्वणी

  विविध सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक विषयांचे देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी बेळगाव : दरवर्षीप्रमाणे यंदाही वडगाव येथील रयत गल्लीमध्ये घरगुती श्री गणेशोत्सवानिमित्त विविध आकर्षक देखावे साकारण्यात आले आहेत. गल्लीतील हौशी युवकांनी कल्पकतेने सादर केलेले धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवरील देखावे भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. यंदा रोहित सप्ले यांनी सुंदर …

Read More »

गणेशोत्सवानिमित्त बेळगाव स्कूटर आणि मोटरसायकल मेकॅनिक्स वेल्फेअर असोसिएशनचा विनामूल्य सेवा उपक्रम

  सामाजिक कार्यकर्ते गणेश दड्डीकर यांचा पुढाकार बेळगाव : गणेशोत्सवात सहभागी होणाऱ्या भाविकांची दुचाकी अचानक नादुरुस्त झाल्यास त्यांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये, यासाठी बेळगाव स्कूटर आणि मोटरसायकल मेकॅनिक्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने १९ सप्टेंबर २०२६ ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत विनामूल्य दुचाकी दुरुस्ती सेवा उपलब्ध करून देण्यात येणार …

Read More »

क्रीडा शिक्षकांच्या कमतरतेचा विद्यार्थ्यांच्या क्रीडा विकासाला फटका

  बेळगाव-चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात ४१७ पदे रिक्त; २०१३ पासून नियमित भरती नाही बेळगाव : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात शिक्षणासोबत क्रीडा शिक्षणालाही महत्त्वाचे स्थान आहे. मात्र शाळांमध्ये आवश्यक प्रमाणात क्रीडा शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना योग्य क्रीडा मार्गदर्शन मिळण्यात अडथळे निर्माण होत आहेत. बेळगाव आणि चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात तब्बल ४१७ क्रीडा शिक्षकांची पदे …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या सार्वजनिक सेवेनिमित्त भाजप उत्तर मंडळातर्फे महिनाभर विविध सामाजिक उपक्रम

  १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान आरोग्य, पर्यावरण, क्रीडा, सेवा व जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन बेळगाव : माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या सार्वजनिक सेवाकाळाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाच्या वतीने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत विविध सामाजिक, सेवाभावी, पर्यावरणपूरक, क्रीडा व जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. …

Read More »

तंजावरच्या साहित्य संमेलनात ‘बेळगावचा झेंडा’!

  सीमाभागातील मान्यवर साहित्यपीठावर विशेष अतिथी बेळगाव (प्रतिनिधी) : मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या इतिहासात मानाचे स्थान असलेल्या तंजावरच्या ऐतिहासिक भूमीत बेळगाव सीमाभागातील मराठी साहित्याचा आवाज बुलंद होणार आहे. बुधवार, दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित श्रीमंत छत्रपती सरफोजीराजे भोसले द्वितीय मराठी साहित्य संमेलनात बेळगाव सीमाभागातील मान्यवर, साहित्यिक आणि कवींचा विशेष …

Read More »

७५ वर्षांवरील ज्येष्ठांना रेशनसाठी बोटांचे ठसे देण्यापासून सूट; डोळ्यांच्या स्कॅनद्वारे धान्य वितरणाचा विचार

  बेळगाव : अन्नधान्य वितरणाची सुविधा अधिक सुलभ करण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना रेशन घेताना बोटांचे ठसे देण्यापासून सूट देण्याचा विचार सुरू आहे. यासाठी रेशन दुकानदारांकडून पात्र ज्येष्ठ लाभार्थ्यांची यादी तयार केली जात असून, डोळ्यांच्या बुबुळांच्या (आयरिस) स्कॅनच्या आधारे धान्य वितरण करण्याचा पर्याय विचाराधीन आहे. …

Read More »

ज्येष्ठ नागरिक सोसायटीतर्फे डॉ. नीता देशपांडे यांचा सत्कार

  बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे औचित्य साधून गेल्या दहा वर्षांपासून सोसायटीला बहुमोल सहकार्य करणाऱ्या डॉ. नीता देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. सोसायटीचे अध्यक्ष विश्वास धुराजी यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. नीता देशपांडे यांनी ज्येष्ठ नागरिक सोसायटीला भविष्यातही आवश्यक ते सहकार्य कायम …

Read More »

एसएसएलसी परीक्षा शुल्कात पाच टक्के वाढ

  नियमित, खासगी आणि फेरपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना वाढीव शुल्काचा भुर्दंड; नोंदणी प्रक्रियेत सुधारित दर लागू बेळगाव : कर्नाटक शाळा परीक्षा मंडळाने २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील एसएसएलसी (दहावी) परीक्षेच्या शुल्कात पाच टक्के वाढ केली आहे. सरकारच्या धोरणानुसार दरवर्षी परीक्षा शुल्कात पाच टक्के वाढ केली जाते. त्यानुसार नियमित विद्यार्थ्यांसह खासगी उमेदवार आणि …

Read More »