Sunday , September 20 2026
Breaking News

बेळगाव

सप्टेंबरमध्ये ऑक्टोबरप्रमाणे हिटचा तडाखा; पावसाअभावी खरीप पिके धोक्यात

भातासह भुईमूग, रताळी, बटाटा व भाजीपाला कोमेजला; शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे बेळगाव : सप्टेंबर महिन्यातच ऑक्टोबर हिटप्रमाणे जाणवणाऱ्या उष्म्याने नागरिक हैराण झाले असताना, दुसरीकडे पावसाने दिलेल्या दडीमुळे खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. गेल्या महिनाभरापासून पावसाने पाठ फिरवल्याने भातासह विविध पिके कोमेजून करपण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे उरलीसुरली पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ …

Read More »

अवरादी ग्रामपंचायत कार्यालय आवारातील बाप-लेकीच्या हत्या प्रकरणी तिघे आरोपी अटकेत

  बेळगाव : कित्तूर तालुक्यातील अवरादी ग्रामपंचायत कार्यालय आवारात १६ सप्टेंबर रोजी झालेल्या बाप-लेकीच्या दुहेरी हत्याकांडातील तीन प्रमुख आरोपींना कित्तूर पोलिसांनी अटक केली आहे. धारवाड येथील रहिवासी रुद्राप्पा शिवनाप्पा कुंदरगी आणि त्यांची मुलगी शशिकला हे अवरादी गावातील मालमत्ता क्रमांक १३५ च्या नाव नोंदणी अर्जाच्या चौकशीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात आले होते. यावेळी …

Read More »

‘सर्वोदयाचा वाटसरू’ आत्मचरित्राचे ४ ऑक्टोबरला प्रकाशन

    मेधा पाटकर यांच्या हस्ते होणार प्रकाशन; प्रबोधिनीच्या बैठकीत पूर्वतयारीचा आढावा बेळगाव : पर्यावरणप्रेमी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व शिक्षणप्रेमी डॉ. शिवाजीदादा कागणीकर यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘सर्वोदयाचा वाटसरू’ या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा रविवार, दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता गोगटे रंगमंदिर, बेळगाव येथे होणार आहे. राज्य मराठी विकास …

Read More »

बेकायदा पेट्रोल-डिझेल साठ्यावर सीसीबीचा छापा; 6.89 लाखांचा मुद्देमाल जप्त

  दोघांना ताब्यात; वाहनासह पेट्रोल-डिझेल जप्त बेळगाव : बेळगाव शहरातील सीसीबी पोलिसांनी देसूर गावाजवळील हॉटपॉट ढाब्याच्या परिसरात बेकायदा पेट्रोल व डिझेल साठवून विक्री करणाऱ्या ठिकाणी छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. या कारवाईत वाहनासह सुमारे 6 लाख 89 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सीसीबी विभागाचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांच्या …

Read More »

जायंट्स सप्ताहाचा दिमाखात शुभारंभ; बालिका आदर्श विद्यालयात व्हॉलीबॉल स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

  बेळगाव : जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्या वतीने आयोजित जायंट्स सप्ताहाचा शुभारंभ बालिका आदर्श विद्यालय येथे व्हॉलीबॉल स्पर्धेने उत्साहात करण्यात आला. प्रसिद्ध डेव्हलपर व बिल्डर आर. एम. चौगुले आणि जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे यांच्या हस्ते नेटपूजन करून स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी फेडरेशन ऑफिसर पूजा प्रवीण त्रिवेदी, डोणकरी, …

Read More »

गणेशोत्सवानिमित्त बेळगाव स्कूटर आणि मोटरसायकल मेकॅनिक्स वेल्फेअर असोसिएशनचा विनामूल्य दुचाकी दुरुस्ती सेवा उपक्रम

  सामाजिक कार्यकर्ते गणेश दड्डीकर यांचा पुढाकार बेळगाव : गणेशोत्सवाच्या काळात बेळगाव शहरात विविध ठिकाणांहून मोठ्या संख्येने गणेशभक्त सहभागी होत असतात. या कालावधीत गणेशभक्तांची दुचाकी नादुरुस्त झाल्यास त्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी बेळगाव स्कूटर आणि मोटरसायकल मेकॅनिक्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने विनामूल्य दुचाकी दुरुस्ती सेवा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमासाठी …

Read More »

‘वंदे मातरम्’च्या मुद्द्यावर भाजपचा बेळगावात भव्य मोर्चा

  काँग्रेस सरकारच्या भूमिकेचा निषेध; जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला निवेदन बेळगाव : कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या ‘वंदे मातरम्’ विषयीच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या बेळगाव ग्रामीण जिल्हा शाखेतर्फे शुक्रवारी बेळगाव शहरात भव्य मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी चन्नम्मा सर्कलपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. ‘वंदे मातरम्’च्या जयघोषासह देशभक्तीपर घोषणांनी …

Read More »

युवा समिती सीमाभाग व पुणे विभाग समितीची बेळगाव येथे संयुक्त बैठक

    सीमालढ्याला बळकटी देण्यासाठी महाराष्ट्रातून व्यापक जनजागृती करण्याचा निर्धार बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग आणि महाराष्ट्र एकीकरण समिती पुणे विभाग यांची संयुक्त बैठक बेळगाव येथील मराठा मंदिर येथे गुरुवारी, दिनांक १७ सप्टेंबर रोजी पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके होते. सीमाप्रश्नाच्या …

Read More »

किल्ला तलाव विकासकामांना गती देण्याचे आयुक्त कार्तिक एम. यांचे निर्देश

  बेळगाव : शहरातील किल्ला तलावाच्या विकासकामांना गती देण्याचे निर्देश महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी दिले. गुरुवारी त्यांनी किल्ला तलाव परिसराला भेट देऊन अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी आयुक्तांनी तलाव व परिसरात सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच उपस्थित अभियंत्यांकडून कामांची सविस्तर माहिती जाणून घेत …

Read More »

श्री मळेकरणी सौहार्द सहकारी संघातर्फे विविध पुरस्कारांचे वितरण

  बेळगाव : उचगाव येथील श्री मळेकरणी सौहार्द सहकारी संघाच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. रविवार, दि. 20 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता शंकर-पार्वती मंगल कार्यालय, उचगाव येथे हा पुरस्कार वितरण व गुणगौरव सोहळा होणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक-चेअरमन जवाहरराव शंकरराव …

Read More »