



दै. मुक्तागिरी दिवाळी अंकाचे दिमाखात प्रकाशन
बेळगाव – साहित्याची मेजवानी असलेल्या दै. मुक्तागिरी (मुक्तांगण) दिवाळी अंकाचे आज दिवाळीच्या पहिल्या दिवशी थाटात प्रकाशन करण्यात आले. दिवाळी हा सण तेजाचे प्रतीक आहे. भारतीय खास खाद्य संस्कृतीचा एक आगळा उत्सव आहे. त्याचबरोबर दिवाळी अंकाच्या माध्यमातून साहित्य संस्कृतीचा सुगंध दरवळण्याचे काम दिवाळी अंकाच्या माध्यमातून होत आहे असे प्रतिपादन साहित्यिक आणि कवयित्री डॉ. संजीवनी खंडागळे यांनी बोलताना केले.
वडगाव शहापूर रोड येथील वेदांत सोसायटी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला संजीवनी खंडागळे यांच्यासह अनुभव वैदिक शाळेचे प्राचार्य डॉक्टर विनोद डी., सिनेनिर्माते दिग्दर्शक डॉ. गणपत पाटील, इंडियन बॉडी बिल्डिंग फेडरेशनचे ऑर्गनायझिंग सेक्रेटरी अनिल अमरोळे, वेदांत सोसायटीचे चेअरमन ज्ञानेश्वर सायनेकर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले. वेदांत सोसायटीचे संचालक संदीप खन्नुकर, कुस्तीगीर संघटनेचे सदस्य हिरालाल चव्हाण, शहापूर सोमवंशी क्षत्रिय कलाल समाजाचे अध्यक्ष ईश्वर जोरापुरे, हरीश दिवटे यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा शाल, स्मृतिचिन्ह, पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी डिजिटल युगात दिवाळी अंकाच्या माध्यमातून माय मराठी संस्कृती, भाषा आणि वाचन संस्कृतीला बळ देण्याचे काम होत आहे. दिवाळी हा सण तेजाचे प्रतीक आहे. भारतीय खास खाद्य संस्कृतीचा एक आगळा उत्सव आहे. त्याचबरोबर दिवाळी अंकाच्या माध्यमातून साहित्य संस्कृतीचा सुगंध दरवळण्याचे काम होत आहे.
यावेळी वेदांत सोसायटीचे सल्लागार जयवंत खन्नुकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संदीप खन्नुकर यांनी प्रास्ताविक केले. श्रीकांत काकतीकर यांनी सर्वांचे आभार मानले. वेदांत सोसायटीचे संचालक श्रीधर खन्नुकर, व्यवस्थापिका विद्या उच्चुकर यांच्यासह अन्य वाचन प्रेमी यावेळी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta