



बेळगाव : एक नोव्हेंबर राज्योत्सव दिनापूर्वी आणि राज्योत्सव दिन संपल्यानंतर बेळगावमध्ये काही कन्नड संघटनांचे कार्यकर्ते मराठी-कन्नड वाद उत्पन्न करून मराठी भाषेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीने दरवर्षीप्रमाणे एक नोव्हेंबर काळा दिन केंद्र सरकारच्या विरोधात अत्यंत गांभीर्याने आणि शांततेने आचरणात आणून आपल्या तीव्र भावना सर्व देशवासीयांसमोर प्रकट केल्या आहेत. युवकांनी आपली ताकद एक नोव्हेंबरला साऱ्यांना दाखवून दिलेली आहे.
अशा प्रसंगी पुन्हा मराठी माणसाला डिवचण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने मराठी जनतेचे एक मंडळ जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्त यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी निवेदन देण्यासाठी शुक्रवार, दिनांक ६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जमावे, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta