Friday , November 6 2026
Breaking News

येळ्ळूर विभागीय प्रतिभा करंजी स्पर्धेत श्री चांगळेश्वरी हायस्कूलचे यश

Spread the love

 

बेळगाव : 4 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र हायस्कूल येळ्ळूर येथे संपन्न झालेल्या येळ्ळूर विभागीय प्रतिभा करंजी स्पर्धेत श्री चांगळेश्वरी हायस्कूल येळ्ळूरच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
वैयक्तिक स्पर्धेत अर्णव गडकरी चित्रकला प्रथम, वैदही पाटील मराठी पद्य वाचन प्रथम, वर्षा पाटील गझल गायन प्रथम, वैष्णवी नारायण कुंडेकर भरतनाट्यम प्रथम,सोनाक्षी मुचंडी धार्मिक पठण प्रथम, श्रावणी सांबरेकर इंग्लिश भाषण प्रथम, प्रतिक बेळगावकर मिमिक्री द्वितीय, आचल देसूरकर इंग्रजी निबंध द्वितीय, लक्ष्मी नायकोजी कन्नड जानपाद गीत द्वितीय, स्नेहा कदम मराठी भावगीत तृतीय, श्रेया पवार मराठी भावगीत तृतीय, वर्षा पाटील व श्रावणी साबरेकर प्रश्नमंजुषा तृतीय, धनश्री कुगजी कन्नड निबंध तृतीय, तर अनुष्का चौगुले व ग्रुप यांनी जानपद नृत्य प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तसेच या गाण्याला साथ देण्यासाठी वर्षा पाटील, श्रुती मजुकर, सरिता पाटील, लक्ष्मी नायकोजी आणि तबला वादक मनीष पवार यांची साथ लागली. या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक नरेंद्र मजुकर, तसेच श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळाच्या वतीने संस्थापक श्री. वाय. एन. मजुकर, सचिव श्री. प्रसाद मजुकर यांनी अभिनंदन केले.

About Belgaum Varta

Check Also

अनाथाश्रमातील मुलांना नवीन कपड्यांचे वाटप

Spread the love    बेळगाव : दिवाळीच्या मंगलमय सणानिमित्त रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या सदस्यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *