उद्या दुपारी ३ ते रात्री १० पर्यंत विविध भागांत व्यवस्था; पर्यावरणपूरक विसर्जनाला प्रोत्साहन बेळगाव : घरगुती गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करता यावे, यासाठी महापालिका व विविध प्रशासनिक यंत्रणांतर्फे शहरातील विविध भागांत फिरत्या जलकुंडांची व्यवस्था करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी, शुक्रवारी नागरिकांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. महापालिकेतर्फे …
Read More »गौरीच्या आगमनाने घराघरांत मंगलमय वातावरण
सौभाग्य, समृद्धी आणि सुख-शांतीसाठी गौरीचे आवाहन; पारंपरिक पद्धतीने पूजनाला सुरुवात बेळगाव : गणरायाच्या आगमनानंतर आता घराघरांत गौरी आगमनाचा मंगलसोहळा सुरू झाला आहे. आज गौरी आवाहनानिमित्त महिलांनी पारंपरिक पद्धतीने गौरीचे स्वागत करून तिचे विधिवत आवाहन केले. गौरीच्या आगमनाने घराघरांत भक्ती, उत्साह आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. गणेशोत्सवातील गौरी पूजनाला …
Read More »जायंट्स सप्ताहाचा उत्साहात प्रारंभ
बेळगाव : येथील जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही जायंट्स सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाचा शुभारंभ बालिका आदर्श विद्यालय येथे व्हॉलीबॉल स्पर्धेला प्रारंभ करून करण्यात आला. बांधकाम व्यावसायिक आर. एम. चौगुले आणि जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनचे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे यांच्या हस्ते नेटपूजन करण्यात आले. यावेळी फेडरेशन ऑफिसर …
Read More »बसरीकट्टी येथे सुवर्ण पदक विजेते प्रज्वल हिरोजीचा सत्कार
बेळगाव : ओडिसातील भुवनेश्वर येथे नुकत्याच पार पडलेल्या ऑल इंडिया स्लिंगशॉट स्पर्धेत (नेमबाजी) बसरीकट्टी गावचे सुपुत्र कु. प्रज्वल लक्ष्मण हिरोजी यांनी पंधरा वर्षे वयोगटात स्लिंगशॉट स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल्याबद्दल त्याचा गावांमध्ये सत्कार करण्यात आला बसरीकट्टी गावातील गावच्या प्रवेश भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये प्रज्वल हिरोजी याचा माजी एसडीएमसी अध्यक्ष …
Read More »१५ वर्षे समर्पणाची… नव्या यशाकडे वाटचाल
‘विवेकानंद’चे चेअरमन कुमार पाटील यांची पत्रकार परिषद बेळगांव : १५ वर्षे समर्पणाची… नव्या यशाकडे वाटचाल अशी बिरुदावली असलेल्या कॉलेज रोड येथील विवेकानंद मल्टीपर्पज सौहार्द को-ऑप. सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दि. २३ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता जगन्नाथराव जोशी सभागृह, गुडसशेड रोड, बेळगांव येथे होणार आहे, अशी माहिती विवेकानंद …
Read More »महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कारप्राप्त गजानन लाड यांचा मच्छेत विविध संस्थांतर्फे सत्कार
मच्छे : मच्छे गावचे सुपुत्र व उद्योजक गजानन लाड यांना नुकताच महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मच्छे गावातील विविध संस्था व संघटनांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मारुती गल्ली, मच्छे यांच्या वतीने गजानन लाड यांना श्री गणेशाची आरती करण्याचा मान देण्यात आला. आरतीनंतर मंडळाचे अध्यक्ष …
Read More »उषःकाल होता होता… काळरात्र झाली!
गणेश चतुर्थीच्या मध्यरात्री भीषण अग्निकांड; धमुने कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू, एक मुलगी बचावली बेळगाव : गणेश चतुर्थीचा उत्साह… घरात गणरायाची प्राणप्रतिष्ठापना… प्रसादाचे वितरण… नातेवाइकांसोबत आनंदाचे क्षण आणि उत्सवाचे फोटो स्टेटसवर अपडेट केल्यानंतर अवघ्या 20 ते 25 मिनिटांतच धमुने कुटुंबावर काळाने घाला घातला. गणेश चतुर्थीची मध्यरात्र या कुटुंबासाठी अक्षरशः …
Read More »रेशन कार्ड ई-केवायसीसाठी अवघे १५ दिवस; सर्व्हर डाऊनचा अडथळा
आतापर्यंत केवळ ३६.४४ टक्के प्रक्रिया पूर्ण; अन्नमंत्र्यांचे सर्व्हर समस्या सोडविण्याचे आदेश बेळगाव : रेशन कार्डची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आता अवघे १५ दिवस शिल्लक राहिले असून, मुदत संपत आल्याने रेशन कार्डधारकांची चिंता वाढली आहे. त्यातच सर्व्हरमधील तांत्रिक अडचणींमुळे ई-केवायसी अभियानाला संथ प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत केवळ ३६.४४ टक्के ई-केवायसी …
Read More »ऐन गणेशोत्सवात SA-1 परीक्षा; विद्यार्थी, पालकांसह शिक्षकांची कोंडी
२१ सप्टेंबरपासून प्रथम सत्र परीक्षा; विसर्जनाच्या दिवशीही पेपर- दसरा सुट्टीच्या नियोजनामुळे शिक्षण विभागावर नाराजी बेळगाव : दसरा सणाच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर ऐन गणेशोत्सवात प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या प्रथम सत्र (SA-1) परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. २१ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या परीक्षा १ ऑक्टोबरपर्यंत चालणार असून, गणेशोत्सवाच्या उत्साहाच्या काळातच विद्यार्थ्यांना …
Read More »सीमाप्रश्नी आजची सुनावणी टळली; आता पुढील तारखेची प्रतीक्षा
नवी दिल्ली : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात बुधवारी (दि. १६) अपेक्षित असलेली सुनावणी पुन्हा होऊ शकली नाही. गेल्या आठवड्यातील सुनावणीही पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्राचे ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड शिवाजीराव जाधव यांनी प्रकरण पुन्हा मेन्शन केले होते आणि त्यानुसार १६ सप्टेंबर रोजी सुनावणी निश्चित झाली होती. मात्र, बुधवारी संबंधित खंडपीठासमोर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta