Friday , November 6 2026
Breaking News

मराठी विद्यानिकेतनमध्ये विज्ञान प्रतिकृती प्रदर्शनाचे उद्घाटन

Spread the love

 

बेळगाव : येथील मराठी विद्यानिकेतन शाळेमध्ये दिनांक 3 नोव्हेंबर 2026रोजी विज्ञान प्रतिकृती प्रदर्शन उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून शिक्षक समन्वयक सविता पवार या उपस्थित होत्या.विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन ,संशोधन वृत्ती, निरीक्षणशक्ती आणि सर्जनशीलता विकसित करणे हाच विज्ञान प्रतिकृती प्रदर्शनाचा उद्देश. विद्यार्थिनी आराध्या अष्टेकर हिच्या हस्ते पाहुण्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर वैज्ञानिक पद्धतीने विज्ञान प्रतिकृती प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रयोगासाठी योग्य प्रयोगाची निवड करणे तिथूनच शोधक सुरू होतात. त्यामुळे ज्या -ज्या विद्यार्थ्यांनी प्रयोग केले ते बालवैज्ञानिकच आहेत. प्रयोगांची सातत्यता वैज्ञानिक दृष्टिकोन जपण्यास मदत करते अशा शब्दात प्रमुख पाहुण्या शिक्षक समन्वयक सविता पवार यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात व्यक्त केले.
शाळेचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एन्.सी. उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी.पाटील, शिक्षण संयोजिका नीला आपटे, शैक्षणिक समुपदेशक गौरी चौगुले, विज्ञान विषय प्रमुख रुपाली हळदणकर,अटल लॅब प्रमुख श्वेता सुर्वेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.विज्ञान विषय शिक्षक मंजुषा पाटील, स्नेहल पोटे, विद्यार्थी उपस्थित होते.सूत्रसंचालन विद्यार्थिनी जिया कांबळे हिने तर आभार प्रदर्शन अटल लॅब असिस्टंट स्नेहा कुप्पेकर यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *