Friday , November 6 2026
Breaking News

दिवाळी खरेदीसाठी बाजारपेठेत चारचाकी वाहनांना बंदी

Spread the love

 

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांचा निर्णय; प्रमुख मार्गांवर बॅरिकेड्स

बेळगाव : दीपावली सणाचा उत्साह वाढू लागल्याने शहरातील बाजारपेठा खरेदीसाठी गजबजू लागल्या आहेत. गुरुवारपासून दीपावली पर्वाला प्रारंभ होत असल्याने बाजारपेठांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी शहरातील प्रमुख बाजारपेठांकडे जाणाऱ्या मार्गांवर चारचाकी वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध घातले आहेत. यासाठी विविध ठिकाणी बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत.

धर्मवीर संभाजी चौक, किर्लोस्कर रोड, गणपत गल्ली आदी परिसरांत बॅरिकेड्स लावून चारचाकी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. किर्लोस्कर रोड, मारुती गल्ली, गणपत गल्ली, रामदेव गल्ली, खडेबाजार आणि समादेवी गल्ली परिसरात सध्या खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ वाढली आहे. विशेषतः सायंकाळच्या वेळी खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

शहरातील या बाजारपेठांमधील अनेक रस्ते अरुंद आहेत. त्यातच दुचाकी वाहनांची वर्दळ आणि खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच बाजारपेठेतील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून प्रमुख चौकांमध्ये बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

एकीकडे दीपावली खरेदीचा उत्साह शिगेला पोहोचत असताना दुसरीकडे बाजारपेठेतील गर्दीमुळे वाहतुकीचा खोळंबा होऊ नये, यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. चारचाकी वाहनांवर घातलेले निर्बंध आणि पोलिसांचा बंदोबस्त यामुळे यंदा दीपावलीच्या खरेदीदरम्यान बाजारपेठेतील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *