



2024, 2025 आणि 2026 मध्ये सलग पदकांची कमाई; सर्वोत्कृष्ट गायिका-अभिनेत्री पुरस्कारानेही गौरव
मुंबई : राज्य नाट्य स्पर्धेत सलग तीन वर्षे रौप्यपदक पटकावून अनुष्का आपटे हिने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 2024, 2025 आणि 2026 अशा सलग तीन वर्षांत रौप्यपदक मिळविण्याचा विक्रम तिने आपल्या नावावर केला आहे.
2 नोव्हेंबर 2026 रोजी मुंबईतील माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात अनुष्का आपटे हिला रौप्यपदक प्रदान करून गौरविण्यात आले. सुप्रसिद्ध दिग्दर्शक विजय गोखले यांच्या हस्ते तिला हे पदक देण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार उपस्थित होते.
अनुष्का हिने 2024 मध्ये ‘संगीत लावणी भुलली अभंगाला’, 2025 मध्ये ‘संगीत आनंदमठ’ आणि 2026 मध्ये ‘संगीत शाकुंतल’ या नाटकांतील कामगिरीसाठी राज्य नाट्य स्पर्धेचे रौप्यपदक मिळविले आहे. सलग तीन वर्षे ही कामगिरी कायम राखत तिने आपल्या अभिनय आणि गायनकौशल्याची छाप उमटवली आहे.
विशेष म्हणजे, अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे 2025 आणि 2026 अशी सलग दोन वर्षे अनुष्काला सर्वोत्कृष्ट गायिका-अभिनेत्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
राज्य नाट्य स्पर्धेतील सलग तीन रौप्यपदके आणि सर्वोत्कृष्ट गायिका-अभिनेत्रीचे दोन पुरस्कार अशी दुहेरी यशस्वी कामगिरी करणाऱ्या अनुष्का आपटे हिचे नाट्य क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta