Sunday , September 20 2026
Breaking News

बेळगाव

‘नाटक हे मराठी भाषा शिकविण्याचे प्रभावी माध्यम’ विषयावर शिक्षक कार्यशाळा संपन्न

बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी, बेळगाव आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांसाठी ‘नाटक हे मराठी भाषा शिकविण्याचे प्रभावी माध्यम आहे’ या विषयावर विशेष शिक्षक कार्यशाळेचे आयोजन बुधवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे करण्यात आले‌ होते. शिक्षकांनी नाटकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मराठी …

Read More »

डॉल्बीमुक्त व पर्यावरणपूरक सण साजरे करण्याचे मराठी विद्यानिकेतनचे आवाहन

  बेळगाव : सण-उत्सव भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग असून, ते आनंद, बंधुभाव आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देतात. मात्र, सण साजरे करताना ध्वनिप्रदूषण व पर्यावरणाची हानी टाळण्याचे आवाहन मराठी विद्यानिकेतन, बेळगावच्या वतीने करण्यात आले. ‘डॉल्बीमुक्त व पर्यावरणपूरक सण साजरे करूया’ या उपक्रमांतर्गत शाळेच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी नागरिकांमध्ये जनजागृती केली. यावेळी जनजागृती …

Read More »

अनगोळ नाक्याजवळ बोरगावच्या तरुणाचा बस-दुचाकी अपघातात जागीच मृत्यू

  बेळगाव : गणेशोत्सवाच्या तयारीसाठी सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या २५ वर्षीय तरुणाचा बस आणि दुचाकीच्या भीषण धडकेत जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना गुरुवारी अनगोळ नाक्याजवळ घडली. सुनील पाटील (वय २५, रा. बोरगाव, ता. निपाणी) असे मृत तरुणाचे नाव आहे. सुनील कामानिमित्त अनगोळ येथे वास्तव्यास होता. गणपती मूर्तीच्या …

Read More »

कॅन्टोन्मेंट हस्तांतरण रखडले; SIR प्रक्रियेला वेग

  केंद्र-राज्य मंजुरीच्या प्रतीक्षेत प्रक्रिया; जिल्ह्यात ८४ हजार नोटिसा, ६२ हजारांचे वाटप पूर्ण बेळगाव : बेळगाव कॅन्टोन्मेंटचा नागरी भाग महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सध्या केंद्र आणि राज्य सरकारच्या मंजुरीअभावी रखडली आहे. दुसरीकडे, मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेला जिल्ह्यात वेग आला असून, आतापर्यंत सुमारे ६२ हजार नोटिसांचे वाटप पूर्ण …

Read More »

दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या वाढणार; बेळगावातील तालुक्यांचाही समावेश होण्याची शक्यता

  वैज्ञानिक निकषांवर होणार निवड; दुसऱ्या टप्प्यातील संभाव्य तालुक्यांची यादी केंद्राकडे पाठविण्याची तयारी बेळगाव : राज्यात पावसाने ओढ दिल्याने अनेक भागांत दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. वैज्ञानिक निकषांच्या आधारे दुष्काळग्रस्त तालुक्यांची निवड केली जात असून, पहिल्या टप्प्यात जाहीर करण्यात आलेल्या १०१ तालुक्यांनंतर आता …

Read More »

भाषिक अल्पसंख्याक समिती तातडीने स्थापन करा; मतदार याद्या मराठीत प्रसिद्ध करण्याची मध्यवर्ती म. ए. समितीची मागणी

  बेळगाव : मराठी भाषिकांच्या तक्रारींच्या निवारणासाठी जिल्हास्तरीय भाषिक अल्पसंख्याक समिती तातडीने स्थापन करावी, तसेच मतदार याद्या मराठी भाषेत प्रसिद्ध कराव्यात, अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यासंदर्भात समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर आणि सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांच्या नेतृत्वाखाली १० सप्टेंबर रोजी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन …

Read More »

अष्टविनायक गणरायाच्या आगमनाने बेळगावात घडणार इतिहास!

  ८० फूट रुंदीची तीन ट्रॉल्यांवर साकारलेली भव्य मूर्ती; पारंपरिक वाद्यांच्या गजरात होणार आगमन सोहळा बेळगाव : बेळगावच्या गणेशोत्सवाची शान मानल्या जाणाऱ्या येळूर रोड, वडगाव येथील अष्टविनायक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाच्या आगमन सोहळ्याला यंदा ऐतिहासिक भव्यतेची किनार लाभणार आहे. तब्बल ८० फूट रुंदीची आणि तीन ट्रॉल्यांवर विस्तारलेली भव्य-दिव्य गणेशमूर्ती हे यंदाच्या …

Read More »

बेळगाव काँग्रेसला मिळाले नवे सारथी; ग्रामीण व शहर जिल्हाध्यक्षांची नियुक्ती

  बेळगाव : बेळगाव जिल्हा काँग्रेसमध्ये महत्त्वपूर्ण फेरबदल करण्यात आला असून, पक्षाच्या ग्रामीण आणि शहर विभागासाठी नव्या अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. एआयसीसीने बेळगाव जिल्हा काँग्रेसच्या ग्रामीण विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी बसवराज शेगावी तर शहर विभागाच्या अध्यक्षपदी राजा सलीम यांची नियुक्ती केली आहे. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने या नियुक्त्या करण्यात …

Read More »

सतीश जारकीहोळींसह निकटवर्तीयांच्या घरांवर दुसऱ्या दिवशीही ईडीची झडती

  बेळगाव : सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या कुटुंबीयांसह निकटवर्तीयांच्या निवासस्थानी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांकडून सुरू असलेली झडती गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिली. सतीश जारकीहोळी यांचे दाजी वाय. मंजुनाथ यांच्या निवासस्थानी ईडी अधिकाऱ्यांकडून कागदपत्रे व विविध माहितीची तपासणी करण्यात येत आहे. तसेच गोकाक येथील सतीश जारकीहोळी यांच्या निवासस्थानीही …

Read More »

ईडी कारवाईविरोधात जारकीहोळी समर्थकांचे निदर्शने; राजकीय सूडबुद्धीचा आरोप

  बेळगाव : सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याशी संबंधित ठिकाणी झालेल्या सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कारवाईविरोधात त्यांच्या समर्थकांनी जिल्हा काँग्रेस कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. यावेळी समर्थक अहमद रेशमी यांनी केंद्र सरकार आणि ईडीच्या कारवाईवर तीव्र टीका करत ही कारवाई राजकीय द्वेषातून व सूडबुद्धीने करण्यात आल्याचा आरोप केला. सतीश जारकीहोळी हे …

Read More »