



सर्वेक्षण अपूर्ण असलेल्या ग्राहकांना हेस्कॉम कार्यालयात कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन
बेळगाव : राज्य सरकारच्या गृहज्योती योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या घरोघरी जाऊन सुरू असलेल्या सर्वेक्षणाची मुदत संपण्यास आता केवळ तीन दिवस शिल्लक आहेत. हेस्कॉमतर्फे सर्वेक्षणाचे काम सुरू असले, तरी अद्याप अनेक ग्राहकांचे सर्वेक्षण पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सर्वेक्षणात सहभागी न होऊ शकलेल्या ग्राहकांनी आवश्यक कागदपत्रे हेस्कॉमच्या संबंधित उपविभागीय कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन जमा करावीत, असे आवाहन हेस्कॉमतर्फे करण्यात आले आहे.
सर्वेक्षणादरम्यान घराला कुलूप असल्याने, घर बंद असल्याने किंवा अन्य काही कारणांमुळे अनेक ग्राहकांची माहिती संकलित होऊ शकलेली नाही. अशा ग्राहकांना आपली आवश्यक कागदपत्रे संबंधित हेस्कॉम कार्यालयात सादर करण्याची संधी राज्य सरकारने उपलब्ध करून दिली आहे.
मात्र, ही कागदपत्रे निर्धारित मुदतीतच जमा करणे आवश्यक आहे. सर्वेक्षणाची मुदत संपण्यासाठी आता अवघे तीन दिवस उरल्याने ग्राहकांनी विलंब न करता संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून कागदपत्रे सादर करावीत. सर्वेक्षणात सहभागी होण्याची ही शेवटची संधी असल्याचे हेस्कॉमने स्पष्ट केले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta