Friday , November 6 2026
Breaking News

प्रवाशांच्या झोपेचा फायदा घेत रेल्वेत चोरी

Spread the love

 

सोन्याचे दागिने आणि आयफोनसह किमती ऐवज जप्त; बेळगाव रेल्वे पोलिसांची कारवाई

बेळगाव  रेल्वे प्रवासादरम्यान झोपलेल्या प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या सराईत चोरट्याला बेळगाव रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. विश्वनाथ दुर्गाप्पा मुतूर (वय २७, रा. बेविनमट्टी, एस. हवेली, ता. व जि. बागलकोट) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून सोन्याचे दागिने आणि आयफोनसह किमती ऐवज जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणातील फिर्यादी महिला १६ सप्टेंबर रोजी उटी येथून बेळगावला येण्यासाठी निघाल्या होत्या. म्हैसूर रेल्वे स्थानकावरून गोलघुमट एक्स्प्रेसने (क्र. १६५३५) प्रवास करत त्या सायंकाळी ६.२० वाजता बेंगळूरला पोहोचल्या. त्यानंतर रात्री ९ वाजता बेळगाव-बेंगळूर एक्स्प्रेसमध्ये (क्र. २०६५३) बसून त्यांनी बेळगावकडे प्रवास सुरू केला.

प्रवासादरम्यान सोन्याचे दागिने असलेली ट्रॉली बॅग त्यांनी आपल्या आसनाखाली ठेवली होती. प्रवासात त्यांना झोप लागली. १७ सप्टेंबर रोजी सकाळी जाग आल्यानंतर बॅगमधील मौल्यवान दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी बेळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.

तपासादरम्यान पोलिसांनी विश्वनाथ मुतूर याला ताब्यात घेऊन चौकशी केली. या चौकशीत त्याने चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून बेळगाव आणि आरसीकेरी रेल्वे पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या चोरीच्या घटनांशी संबंधित सोन्याचे दागिने आणि आयफोनसह किमती ऐवज जप्त करण्यात आला आहे.

रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांच्या झोपेचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्या संशयिताला अटक केल्याने रेल्वेतील चोरीच्या घटनांच्या तपासाला महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *