Friday , November 6 2026
Breaking News

काळादीन कडकडीत आणि गांभीर्याने पाळणार; निवडणुकांमध्ये भगवा फडकविण्याचा निर्धार

Spread the love

 

येळ्ळूर : येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वाची बैठक मंगळवार दिनांक 27 ऑक्टोबर 2026 रोजी श्री बाल शिवाजी वाचनालय येथे श्री. विलास ना. घाडी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायविरोधात आक्रमक भूमिका घेत, यंदाचा काळादिन अत्यंत कडकडीत आणि गांभीर्याने पाळण्याचा एकमुखी निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच, आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत, तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत निवडणुकांमध्ये एकजूट दाखवून विजयाचा भगवा फडकविण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला. बैठकीच्या प्रारंभी गावातील दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्याध्यक्ष भुजंग पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले, माजी ग्राम पंचायत अध्यक्ष श्री. सतीश बा पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी शांताराम कुगजी, परशराम धाकोजी घाडी, रमेश ग पाटील, लक्ष्मण छत्रणावर, दुर्गाप्पा ताशीलदार, हणमंत बा. पाटील, मनोहर घाडी, शुभम जाधव यांनी विचार मांडले. मनोहर सी. पाटील यांनी ग्राम पंचायत, तालुका पंचायत व जिल्हा पंचायतीच्या आरक्षणाबद्दल माहिती दिली.

काळादिन पाळण्याचे आवाहन

सीमाभागातील मराठी भाषिकांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि सीमाप्रश्नाबाबत शासनाच्या निषेधार्थ येत्या रविवार दिनांक 1 नोव्हेंबर 2026 रोजी छत्रपती श्री संभाजी उद्यान येथून निघणाऱ्या सायकल फेरीत सहभागी होऊन काळादिन कडकडीत आणि गांभीर्याने पाळण्याचे आवाहन करण्यात आले.

आगामी निवडणुकांबाबत रणनीती

येत्या ग्रामपंचायत, तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत निवडणुकांमध्ये येळळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी तळागाळातून तयारी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच योग्य उमेदवार देऊन सर्व उमेदवारांना विजयी करून भगवा फडकविण्याचा निर्धार करण्यात आला.

मराठी भाषिकांची एकता

सीमाभागातील मराठी भाषिकांच्या अस्मितेसाठी आणि हक्कांसाठी सर्वांनी गटतट बाजूला सारून एकत्र येण्याचे आवाहन यावेळी ज्येष्ठ नेत्यांनी केले.
सीमाभागातील मराठी भाषिकांचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. बैठकीला श्री. शिवाजी नांदुरकर, मनोहर आ. पाटील, एन. डी. पाटील, आनंद पाटील, मल्लाप्पा काकतीकर, गोपाळ शहापूरकर, चांगाप्पा कुगजी, तानाजी पाटील, राजु ऊघाडे, परशराम परीट, मनोहर म. पाटील, यल्लाप्पा बिर्जे, सिद्धार्थ पाटील, बापूसाहेब पाटील, मधु पाटील, संदीप पाटील, आकाश हलगेकर, रमेश गणपती पाटील, गोविंद बापूसाहेब पाटील, मनोज बेकवाडकर, सोमनाथ बाबले, पृथ्वीराज धामणेकर, अमित शहापूरकर, श्रीपती हुवन्नावर, अनंत पाटील, बाळकृष्ण पाटील, आनंद घाडी, मारुती यळगुकर, आनंद कृष्णा घाडी, शटूप्पा कांबळे, बाळकृष्ण अनंत पाटील, रवी शिवाजी धामणेकर आदी उपस्थित होते. शेवटी मनोहर घाडी यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *