Friday , November 6 2026
Breaking News

१ नोव्हेंबरचा काळा दिन यशस्वी करण्याचा म. ए. समितीचा निर्धार; शहापूर परिसरात जनजागृती सभा

Spread the love

 

बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषिकांच्या भाषिक हक्कांसाठी आणि महाराष्ट्रात सामील होण्याच्या मागणीसाठी १ नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणारा काळा दिन यशस्वी करण्याचा निर्धार महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी केला. यानिमित्त शहापूर येथील गाडीमार्गावरील श्रीराम मंदिरात जनजागृती सभा घेण्यात आली.

सभेच्या अध्यक्षस्थानी बेळगावचे माजी उपमहापौर संजय शिंदे होते. सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाचा निषेध नोंदवून, यंदाचा काळा दिन व्यापक सहभागातून आणि शांततापूर्ण मार्गाने पाळण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.

या सभेला म. ए. समितीचे नेते नेताजी जाधव, राजेंद्र बिरजे, महादेव पाटील, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्यासह प्रशांत भातकांडे, श्रीकांत कदम, गुंडू कदम, किरण हुद्दार, शेखर तळवार, सूरज चव्हाण, सागर पाटील, सुनील बोकडे, विलास लाड, रमेश चौगुले, विक्रांत लाड, सुधीर काळकुंद्रीकर, चंदन भागाने, महेश उत्सुकर, प्रथमेश मिरजकर आणि विजय कानबरकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

घरोघरी जनजागृतीवर भर

१ नोव्हेंबरच्या काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर सीमाभागातील मराठी भाषिकांमध्ये जनजागृती वाढविणे, अधिकाधिक नागरिकांना फेरीत सहभागी होण्यासाठी आवाहन करणे आणि आपल्या भागात प्रचार मोहीम तीव्र करणे, यावर सभेत भर देण्यात आला. काळा दिन शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पाळण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *