



बेळगाव : एक नोव्हेंबर काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने मंडोळी व हंगरगा गावात जनजागृती करण्यात आली. सीमाप्रश्नाची पार्श्वभूमी, सीमाभागातील मराठी भाषिक जनतेची भूमिका आणि महाराष्ट्रात सामील होण्याची मागणी याबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्यात आली.
एक नोव्हेंबर १९५६ रोजी भाषावार प्रांतरचनेच्या वेळी मराठीबहुल बेळगावसह सीमाभाग तत्कालीन म्हैसूर राज्यात समाविष्ट करण्यात आला. या निर्णयाच्या निषेधार्थ सीमाभागात दरवर्षी एक नोव्हेंबर हा दिवस काळा दिन म्हणून पाळला जातो. यंदाही काळा दिनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर, राजू किणेकर, आनंद पाटील (बेनकनहळ्ळी), नारायण दळवी, बाबासाहेब फगरे, लक्ष्मण नावगेकर, धाकलू पाटील, परशराम शहापूरकर, मोनाप्पा पाटील, पिराजी पाटील, शांताराम कसलकर, बाळू पेडणेकर, राजू कणबरकर, आनंद पाटील, कल्लाप्पा पाटील, राजू ध. कणबरकर, कृष्णा हुंदरे, सोमनाथ दळवी, केदारी कणबरकर, प्रवीण हुंदरे, यल्लाप्पा गेणुचे, नारायण पाटील, महादेव पाटील, मनोहर दळवी, सचिन दळवी यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta