Friday , November 6 2026
Breaking News

लिंगराज महाविद्यालयात ४ व ५ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय स्तरावरील साहित्य सलग अकराव्या वर्षी महोत्सवाचे आयोजन

Spread the love

 

बेळगाव : के.एल.ई. संस्थेच्या लिंगराज महाविद्यालय, बेळगावी (स्वायत्त) येथील इंग्रजी विभागाच्या वतीने दिनांक ४ व ५ नोव्हेंबर २०२६ रोजी ‘राष्ट्रीय स्तरावरील साहित्य महोत्सव’ (National Level Literary Fest) आयोजित करण्यात आला आहे.

‘Words Without Borders: Literature in an Interconnected World’ अर्थात ‘सीमांच्या पलीकडील शब्द : परस्परांशी जोडलेल्या जगातील साहित्य’ ही या महोत्सवाची संकल्पना आहे. साहित्याच्या माध्यमातून विविध भाषा, संस्कृती आणि विचार यांच्यातील परस्परसंबंध अधोरेखित करणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे.

या महोत्सवात पदवी पूर्व, पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. साहित्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करणे, त्यांची सर्जनशीलता विकसित करणे आणि साहित्याच्या विविध पैलूंचा परिचय करून देणे, या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या महोत्सवाचे विद्यार्थी समन्वयक म्हणून श्री. सतीश कराडी आणि कु. समिहा दाणेवाले कार्यरत असून, प्राध्यापक समन्वयक म्हणून सौ. सारिका नगरे जबाबदारी सांभाळत आहेत.

महाविद्यालयाचे इंग्रजी विभागप्रमुख डॉ. शशिकांत कोन्नूर, आयक्यूएसी समन्वयक सौ. विभा हेगडे आणि प्राचार्य डॉ. एच. एस. मेलीनमनी यांच्या मार्गदर्शनाखाली या साहित्य महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.

इच्छुक विद्यार्थ्यांनी दिलेल्या क्यूआर कोडद्वारे नोंदणी करून या राष्ट्रीय स्तरावरील साहित्य महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *