


बेळगाव : श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर यांच्या १२१ व्या पुण्यतिथी उत्सवाला मंगळवार रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने प्रारंभ झाला. समादेवी गल्ली बेळगाव पासून बाळेकुंद्री येथे प्रेमध्वज मिरवणुकाला प्रारंभ झाला. यावेळी मंगळवारी सकाळी पंतवाडा समादेवी गल्ली गल्ली येथील मुख्य देवस्थानच्या कार्यालयात श्री पंत महाराजांच्या प्रतिमेला आणि प्रेम ध्वजाला पुष्पहार अर्पण करून महाआरती करण्यात आली. यावेळी पंत महाराजांचे वंशज प.पू.रंजन पंतबाळेकुंद्री, राजन पंत बाळेकुंद्री, डॉ.संजय पंतबाळेकुंद्री, अभिजीत पंतबाळेकुंद्री यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. याप्रसंगी संस्थांचे अध्यक्ष राजन पंतबाळेकुंद्री उपस्थित भक्तांना मार्गदर्शन केले. या प्रसिद्ध आनंद किल्लेकर डॉ. बाळमुकुंद राणे, वैभव सायणाकर, यमुन्नाका महिला मंडळ व भजनी मंडळ, पुरुष व महिलाभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगाव शहरातील मुख्य मार्गावरून जात बेळगाव-बागलकोटमार्गे दुपारी पंत बाळेकुंद्री येथील वाड्यात पोहोचली. तर सायंकाळी पाच वाजता श्रीपंत वाड्यातून प्रेमध्वज मिरवणूक निघेल. रात्री आठ वाजता प्रेम ध्वजारोहण होऊन मुख्य उत्सवाला प्रारंभ होईल. बुधवार दि. २८ रोजी पहाटे पाच वाजता पुण्यस्मरण कार्यक्रम होईल. सकाळी सात वाजता श्रींची पालखी गावातील श्रींच्या वाड्यातून समारंभाने निघून दुपारी आमराईतील श्रीपंत स्थानी येईल. तर रात्री आठ ते बारा या वेळेत पालखी सेवा होईल.
गुरुवार दि. २९ रोजी दुपारी बारा वाजता महाप्रसाद होईल. तर दुपारी तीन ते पाच या वेळेत प्रेमानंद टिपरी कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी सहा वाजता श्रींची पालखी आमराईतील पूज्यस्थानी जाऊन गावातील वाड्यात पोहोचेल व उत्सवाची सांगता होईल.

Belgaum Varta Belgaum Varta