



बेळगाव : बेळगाव तालुक्यातील देमट्टी–मल्लापूर मार्गावर टाटा एस वाहन आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दाम्पत्यासह तिघांचा मृत्यू झाला. सोमवारी रात्री ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या अपघातात देमट्टी येथील अझाद इस्माईल जमादार (वय ४५), त्यांची पत्नी खैरून अझाद जमादार (वय ४०) आणि त्यांचे जावई बाबाजान निस्सारअहमद तडकोड (वय १६) यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, तिघेही दुचाकीवरून देमट्टी येथून कित्तूरकडे जात असताना टाटा एस वाहनाशी त्यांची धडक झाली. या भीषण अपघातात तिघांनाही जीव गमवावा लागला.
मृत दाम्पत्य मूळचे धारवाड तालुक्यातील हेग्गेरी गावचे रहिवासी होते. त्यांच्यावर हेग्गेरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले, तर बाबाजान याच्यावर देमट्टी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
या प्रकरणी कित्तूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Belgaum Varta Belgaum Varta