Sunday , September 20 2026
Breaking News

बेळगाव

कुद्रेमानी–सोनोली रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ

  आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते भूमिपूजन; 4 कोटींचा निधी मंजूर कुद्रेमानी (प्रतिनिधी) : बेळगाव ग्रामीणच्या आमदार तथा कर्नाटक राज्याच्या माजी महिला व बालकल्याण विकास मंत्री लक्ष्मीताई आर. हेब्बाळकर यांच्या आमदार निधीतून मंजूर झालेल्या कुद्रेमानी–सोनोली रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ मंगळवारी कुद्रेमानी येथे उत्साहात झाला. मंत्री हेब्बाळकर यांनी विधिवत पूजन करून …

Read More »

बेळगावला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी कठोर उपाययोजनांची मागणी

  नूतन पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांची सदिच्छा भेट बेळगाव : नुकतेच बेळगाव शहराच्या पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारलेले श्री. प्रकाश निकम यांची मंगळवारी ८ सप्टेंबर २०२६ रोजी विविध भागातील लोकप्रतिनिधी, माजी उपमहापौर, माजी नगरसेवक-नगरसेविका, विविध सामाजिक संस्थांचे प्रमुख तसेच मान्यवरांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी नूतन पोलीस आयुक्तांना शुभेच्छा देत शाल, …

Read More »

विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात; गोडसे शैक्षणिक निधीतर्फे ३७ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

  बेळगाव : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने श्री. खेमाजीराव तुकाराम गोडसे शैक्षणिक निधी (ट्रस्ट) यांच्या वतीने आयोजित शैक्षणिक बक्षीस वितरण समारंभ सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी सह्याद्री मल्टीस्टेट पतसंस्था, महिला विद्यालयाजवळ, बेळगाव येथे उत्साहात पार पडला. यावेळी ३७ गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमास बी.के. …

Read More »

युवा समिती सीमाभागच्या पाठपुराव्याची दखल; मराठी-उर्दू शिक्षक भरतीसाठी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडून कर्नाटक सरकारकडे पाठवली निवेदने

  बेळगाव : कर्नाटक सरकारच्या प्राथमिक शिक्षकांच्या भरती प्रक्रियेत मराठी व उर्दू माध्यमांना डावलण्यात आल्याच्या मुद्द्यावर महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग आणि खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने केलेल्या पाठपुराव्याची जिल्हा शिक्षण विभागाने दखल घेतली आहे. मराठी व उर्दू माध्यमांच्या शिक्षक भरतीबाबत सादर करण्यात आलेली निवेदने पुढील कार्यवाहीसाठी कर्नाटक सरकारच्या शिक्षण …

Read More »

मंगळागौरीतून समृद्ध लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन

  नवरत्न सन्मानाने आज बुधवारी श्री गणेश फेस्टिवलची सांगता बेळगाव : मराठमोळ्या पारंपरिक संस्कृतीतील महत्त्वाचा सण असलेल्या मंगळागौरीचा उत्साह मंगळवारी श्री गणेश फेस्टिवलच्या व्यासपीठावर अनुभवायला मिळाला. नक्षत्र ग्रुपच्या महिलांनी पारंपरिक वेशभूषेत मंगळागौरीची गीते तसेच घागर, झिम्मा, फुगडी यांसह विविध पारंपरिक खेळ सादर करून समृद्ध लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे मनोहारी दर्शन …

Read More »

सुहासिनी महिला मंडळातर्फे श्रावण उत्सव उत्साहात

  मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांतून संस्कृती-परंपरेचा जागर बेळगाव : पटवर्धन लेआउट, वडगाव येथील सुहासिनी महिला मंडळाच्या वतीने श्रावण महिन्यातील सण-उत्सवांचे महत्त्व, त्यामागील सांस्कृतिक परंपरा आणि वारसा जाणून घेत श्रावण उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला बेळगावच्या महापौर प्रीती कामकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी मंडळाच्या …

Read More »

कॅन्टोनमेंट मराठी शाळेत विद्यार्थिनींसाठी लाठी प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ

  स्वसंरक्षणासोबत आत्मविश्वास आणि शारीरिक सामर्थ्य वाढविण्यावर भर; विद्यार्थ्यांना ऑक्टोबरमध्ये मोफत स्विमिंग प्रशिक्षणाची घोषणा बेळगाव : कॅम्प परिसरातील कॅन्टोनमेंट मराठी मुलामुलींच्या शाळेत विद्यार्थिनींच्या स्वसंरक्षणासाठी आणि शारीरिक सक्षमीकरणासाठी लाठी प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. भारतीय जनता पार्टीचे नेते व सकल मराठा समाजाचे संयोजक किरण जाधव यांच्या हस्ते या प्रशिक्षण …

Read More »

गणेश फेस्टिवलतर्फे उद्या बेळगावात नवरत्नांचा सत्कार

  बेळगाव : श्री माता को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, श्री भक्ती महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, श्री राजमाता महिला मल्टीपर्पज सोसायटी तसेच ज्ञानमंदिर इंग्रजी माध्यम शाळेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘श्री गणेश फेस्टिवल बेळगाव’चा सांगता सोहळा बुधवार, दि. 9 सप्टेंबर 2026 रोजी होणार आहे. यानिमित्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या नवरत्नांचा सत्कार करण्यात …

Read More »

१८ चर्मकार बांधवांना मिळाला हक्काचा रोजगार; आमदार राजू शेठ यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण

  बेळगाव : बेळगाव उत्तरचे आमदार श्री असिफ (राजू) शेठ यांच्या पुढाकारातून चर्मकार समाजातील १८ गरीब व गरजू बांधवांना सुसज्ज व्यावसायिक खोकी (दुकाने) उपलब्ध करून देण्यात आली. या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण आमदार राजू शेठ यांच्या हस्ते करण्यात आले. समाज कल्याण विभाग आणि डॉ. बाबू जगजीवन राम विकास निगम (लीडकर) यांच्या …

Read More »

महिला बेपत्ता प्रकरणाला कलाटणी; प्रियकराने हत्या करून उसाच्या शेतात फेकला मृतदेह

    बेळगाव : गेल्या महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या एका महिलेच्या प्रकरणाला धक्कादायक कलाटणी मिळाली असून, तिची हत्या करून मृतदेह उसाच्या शेतात फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या प्रियकराला अटक केली आहे. बेळगाव जिल्ह्यातील मूडलगी तालुक्यातील कुलगोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कौजलगी गावाजवळ ही घटना घडली. मृत महिलेची …

Read More »