


गौंडवाड येथील ७० वर्षीय भावकाण्णा पिंगट यांचा मृत्यू; काकती पोलिसांकडून तपास सुरू
बेळगाव : गौंडवाड (ता. बेळगाव) येथील एका वृद्धाने मार्कंडेय नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. भावकाण्णा सिद्राई पिंगट (वय ७०, रा. गौंडवाड) असे मृत वृद्धाचे नाव आहे. या घटनेची नोंद काकती पोलीस ठाण्यात झाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चार वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात भावकाण्णा यांच्या डोक्याला आणि पायांना दुखापत झाली होती. तेव्हापासून त्यांची मानसिक स्थिती ठीक नव्हती. रविवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते सोमवार सकाळी ९ या कालावधीत त्यांनी मार्कंडेय नदीपात्रात उडी घेतल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी काकती पोलिसांनी नोंद केली असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Belgaum Varta Belgaum Varta