Friday , November 6 2026
Breaking News

रेडिमेड किल्ले खरेदीकडे बाळगोपाळांचा कल

Spread the love

 

 

शिवाजी महाराज, मावळे, हत्ती, घोडे : प्लास्टिक मूर्ती बाजारात दाखल

निपाणी (वार्ता) : दिवाळी मातीचे किल्ले बनविण्यासाठी लहानग्यांची धडपड सुरू होते. मात्र शहरीकरणात माती, दगड आणि जागा मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे इमारतीच्या छोटयाशा आवारात हातांनी माती, चिखल पासून किल्ले साकारण्याऐवजी आता बाजारात तयार किल्ले आणून बाळगोपाळ दिवाळी साजरी करू लागले आहेत.
मागील काही वर्षांपासून बाजारात तयार गड- किल्ल्यांना यंदाच्या दिवाळीत वाढली मागणी आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसचे विविध रंगाचे व आकाराचे किल्ले बाजारात विक्रीसाठी आले आहेत. याबरोबर शिवाजी महाराज, मावळे, प्राणी, पशू-पक्ष्यांच्या मूर्तीही विक्रीसाठी उपलब्ध असून त्याच्या किमती २५० ते १००० रुपयापर्यंत आहेत.
स्मार्ट फोनच्या जमान्यात गेम्समध्ये अधिक रमत असणारी मुले आता पुन्हा विक्रीसाठी रेडिमेड किल्ले घरी आणून खेळताना दिसत आहेत.
—–
मावळे मात्र मातीचेच
किल्ले जरी रेडिमेड असले तरी मातीपासून तयार केलेले मावळे आहेत. यामध्ये सिंहासनावर बसलेले छत्रपती शिवाजी महाराज, भालेदार, चोपदारसह इतर वस्तूंचा समावेश आहे.
—-
‘रेडिमेड किल्ला खरेदीकडे लहान मुलांचा ओढा वाढलेला आहे. आता लहान मुलांमध्ये मातीचे किल्ले बनविण्याबाबत उत्साह दिसून येत नसल्याने ते रेडिमेड किल्ले खरेदी करीत आहेत.
-संदेश कुंभार, रेडिमेड किल्ले विक्रेता, निपाणी

About Belgaum Varta

Check Also

राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत निपाणीच्या रतिक लाखेचे दुहेरी यश

Spread the love  निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्यस्तरीय शरीरसौष्ठव (बॉडीबिल्डिंग) स्पर्धांमध्ये निपाणी येथील‌ रुतिक लाखे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *