Friday , November 6 2026
Breaking News

शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या आमिषाने दोन लाखांची फसवणूक

Spread the love

 

व्हॉट्सॲपवरून संपर्क साधत अधिक परताव्याचे दाखविले आमिष; सायबर पोलिसांकडून तपास सुरू

बेळगाव : सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना विविध आमिषे दाखवून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास अधिक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून मुतगा येथील एका ४७ वर्षीय व्यक्तीची दोन लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.

या प्रकरणातील तक्रारदार जयकुमार (वय ४७, रा. मुतगा) यांना १ जुलै २०२६ रोजी एका अनोळखी व्यक्तीने व्हॉट्सॲपवरून संपर्क साधला. शेअर बाजार आणि गुंतवणुकीसंदर्भात माहिती देण्याच्या बहाण्याने संबंधित व्यक्तीने जयकुमार यांना अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर वारंवार संदेश पाठवून त्यांना गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित केले.

संबंधित व्यक्तीच्या आश्वासनावर विश्वास ठेवून जयकुमार यांनी २ जुलै रोजी सांगण्यात आलेल्या बँक खात्यावर एनईएफटीद्वारे दोन लाख रुपये वर्ग केले. मात्र, पैसे पाठविल्यानंतर संबंधित व्यक्तीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. गुंतवणुकीची रक्कम परत मिळाली नाही आणि आश्वासन दिल्याप्रमाणे नफाही मिळाला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे जयकुमार यांच्या लक्षात आले.

यानंतर त्यांनी सायबर हेल्पलाइन क्रमांक १९३० वर संपर्क साधून तक्रार नोंदविली. या तक्रारीच्या आधारे प्रकरणाची नोंद करण्यात आली. सुरुवातीला झिरो एफआयआर म्हणून दाखल करण्यात आलेले हे प्रकरण पुढील तपासासाठी बेळगाव शहर सायबर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *