Friday , November 6 2026
Breaking News

१ नोव्हेंबर काळ्या दिनाच्या मूक सायकल फेरीत हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचा बेनकनहळ्ळी ग्रामस्थांचा निर्धार

Spread the love

 

बेळगाव : १ नोव्हेंबर काळ्या दिनाच्या मूक सायकल फेरीत हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार बेनकनहळ्ळी येथील ग्रामस्थांनी केला आहे. या संदर्भात आयोजित बैठकीला माजी आमदार मनोहर किणेकर, युवा आघाडी अध्यक्ष राजू किणयेकर आणि पुंडलिक सुतार उपस्थित होते.

यावेळी १ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या मूक सायकल फेरीत बेनकनहळ्ळी गावातून मोठ्या संख्येने सहभागी होण्याबाबत चर्चा करण्यात आली. सीमाभागातील मराठी भाषिकांच्या भावना आणि महाराष्ट्रात सामील होण्याची मागणी अधोरेखित करण्यासाठी या मूक सायकल फेरीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले.

या बैठकीला प्रभाकर देसुरकर, आनंद पाटील, भरमा देसुरकर, रामा पाटील, मारुती पाटील, चंद्रकांत पाटील, मारुती पुंडलिक पाटील, भाऊ काटकर, जोतिबा पाटील, भरमा पाटील, सुमित पाटील आणि गजानन देसुरकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

१ नोव्हेंबरच्या मूक सायकल फेरीत हजारोंच्या संख्येने सहभागी होऊन सीमाप्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा निर्धार यावेळी बेनकनहळ्ळी ग्रामस्थांनी व्यक्त केला.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *