Friday , November 6 2026
Breaking News

शिरूर धरणात बुडून २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू; शोधमोहीमेनंतर मृतदेह सापडला

Spread the love

 

बेळगावच्या शिवाजीनगरमधील युवकाचा दुर्दैवी अंत; बचाव पथक, एसडीआरएफ आणि पोलिसांची संयुक्त मोहीम

बेळगाव : शिरूर धरणात पाय घसरून पडल्याने बेळगावच्या २१ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. आशिष अशोक राजगोळकर असे मृत तरुणाचे नाव असून, तो बेळगावमधील शिवाजीनगर पाचव्या क्रॉस येथे राहत होता. तो वेगा हेल्मेट कंपनीत कामाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, आशिष हा काल सायंकाळी शिरूर धरणात चुकून पाय घसरून पडला. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर आणि पद्मप्रसाद हूली यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.

त्यानंतर सोशल वर्कर रेस्क्यू टीम, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) आणि यमकनमर्डी पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तपणे शोधमोहीम राबवली. अथक प्रयत्नांनंतर आज सायंकाळी सुमारे ५.३० वाजता आशिषचा मृतदेह शोधण्यात यश आले.

या कठीण शोधमोहिमेत बचाव पथकातील सदस्य, एसडीआरएफ जवान आणि पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेचे व समन्वयाचे स्थानिक नागरिकांकडून कौतुक होत आहे. तरुणाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *