बेळगाव : श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर यांच्या १२१ व्या पुण्यतिथी उत्सवाला मंगळवार रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने प्रारंभ झाला. समादेवी गल्ली बेळगाव पासून बाळेकुंद्री येथे प्रेमध्वज मिरवणुकाला प्रारंभ झाला. यावेळी मंगळवारी सकाळी पंतवाडा समादेवी गल्ली गल्ली येथील मुख्य देवस्थानच्या कार्यालयात श्री पंत महाराजांच्या प्रतिमेला आणि प्रेम ध्वजाला पुष्पहार अर्पण करून …
Read More »सौंदत्ती यल्लम्मा क्षेत्राच्या विकासासाठी २१५ कोटींची योजना!
सहा हजार भाविकांसाठी अन्नदासोहाची सुविधा; धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘टेम्पल टुरिझम कॉरिडॉर’चा प्रस्ताव बेळगाव : उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणुका यल्लम्मा मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने २१५ कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी योजनेला प्रारंभ केला आहे. भाविकांसाठी आधुनिक सुविधा, सुलभ दर्शन व्यवस्था, भव्य अन्नदासोह संकुल आणि …
Read More »कवितांतून स्त्रीवेदनांचा हुंकार; रसिकांची मने हेलावली!
‘कवी समजून घेताना’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद बेळगाव : स्त्रीजीवनातील वेदना, स्त्रीभ्रूणहत्येचे वास्तव, पुरुषप्रधान व्यवस्थेतील विसंगती, शेतकरी कुटुंबाचा संघर्ष, पर्यावरणाचा ऱ्हास आणि प्रेमातील विरह अशा विविध विषयांना कवितेतून भिडत कवयित्री सीमा कणबरकर यांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. सामाजिक प्रश्नांवर परखड भाष्य करणाऱ्या आणि मानवी भावभावनांना संवेदनशीलपणे स्पर्श करणाऱ्या त्यांच्या कवितांनी …
Read More »बेळगावात मराठा एलआयआरसीतर्फे ८० वा इन्फंट्री दिन उत्साहात साजरा
शहीद जवानांना पुष्पचक्र अर्पण करून वीरांच्या बलिदानाला अभिवादन बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर (मराठा एलआयआरसी), बेळगाव येथे ८० वा इन्फंट्री दिन अत्यंत गांभीर्यपूर्ण आणि अभिमानास्पद वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रसेवेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूरवीरांना आदरांजली अर्पण करून भारतीय लष्कराच्या शौर्य, त्याग आणि कर्तव्यनिष्ठेच्या गौरवशाली परंपरेचे स्मरण …
Read More »१ नोव्हेंबर काळ्यादिनी बेळगाव येथील सायकल फेरी व सीमाभागातील लाक्षणिक धरणे आंदोलनाला बहुसंख्येने उपस्थित राहा
म.ए.युवा समिती सिमाभागचे आवाहन बेळगाव : तत्कालीन केंद्र सरकारने बहुसंख्य मराठी भाषिकांच्या भावनांना तिलांजली देत १ नोव्हेंबर १९५६ रोजी कर्नाटक राज्याची निर्मिती केली, यासाठी सीमाभागातील मराठी जनता हा दिवस काळा दिन म्हणून सुतक पाळते. याच अनुषंगाने आज महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागची बैठक पिरणवाडी येथे पार पडली, या बैठकीच्या …
Read More »लिंगराज महाविद्यालयाचे सलग १० व्या वर्षी ॲथलेटिक्स स्पर्धेवर वर्चस्व!
बेळगाव : केएलई संस्थेच्या लिंगराज महाविद्यालयाने (स्वायत्त), बेळगावने किट्टूर राणी चन्नम्मा विद्यापीठ, बेळगाव यांच्या वतीने आयोजित दहाव्या आंतरमहाविद्यालयीन ॲथलेटिक्स स्पर्धेत सलग दहाव्यांदा सर्वसाधारण विजेतेपद पटकावून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. २३ ते २५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विजापूर येथील कर्नाटक राज्य अक्कमहादेवी महिला विद्यापीठाच्या क्रीडा मैदानावर ही स्पर्धा पार पडली. …
Read More »दहावी, बारावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच
जनगणना सर्वेक्षणामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची शक्यता फेटाळली; लवकरच अंतिम वेळापत्रक बेळगाव : जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षणामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा विचार सुरू असल्याची चर्चा असतानाच, या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच घेतल्या जाणार असल्याचे कर्नाटकचे शालेय शिक्षणमंत्री मधु बंगाराप्पा यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा पुढे ढकलल्या जाण्याच्या …
Read More »७ डिसेंबरपासून बेळगावात हिवाळी अधिवेशन होण्याची शक्यता
सुवर्ण विधानसौधात १० दिवस कामकाज; सरकारच्या संभाव्य निर्णयाकडे लक्ष बेळगाव : कर्नाटक विधिमंडळाचे यंदाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबर २०२६ पासून बेळगावातील सुवर्ण विधानसौधात घेण्याचा संभाव्य निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार, विधानसभेचे आणि विधानपरिषदेचे कामकाज सुमारे १० दिवस चालण्याची शक्यता आहे. मात्र, अधिवेशनाच्या तारखा आणि कालावधीबाबत …
Read More »२४ तास पाणीपुरवठा योजनेचा बोजवारा!
अपूर्ण कामे, जलवाहिन्यांना गळती अन् गढूळ पाण्याचा पुरवठा; नागरिक हैराण, एल अँड टीच्या कारभारावर नाराजी बेळगाव : पाणीटंचाईने हैराण झालेल्या बेळगावकरांना २४ तास पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून दिलासा मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, या योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटींमुळे नागरिकांच्या पदरी निराशाच पडत आहे. शहरात ठिकठिकाणी सुरू असलेली अपूर्ण कामे, जलवाहिन्यांना लागलेली गळती, …
Read More »भूतरामट्टी प्राणिसंग्रहालयात झेब्रा, जिराफचे आगमन!
दुर्मिळ पक्षी, नव्या प्रजातींचे साप आणि मगरींचाही समावेश करण्याचे नियोजन; मध्यम श्रेणीचा दर्जा मिळविण्यासाठी प्रस्ताव बेळगाव : बेळगावच्या वन्यजीव पर्यटनाला नवी ओळख मिळवून देण्याच्या दृष्टीने भूतरामट्टी येथील कित्तूर राणी चन्नम्मा प्राणिसंग्रहालयात विविध वन्यप्राण्यांचा समावेश करण्याची तयारी सुरू आहे. झेब्रा, जिराफ यांसारख्या आकर्षक प्राण्यांसह दुर्मिळ पक्षी, विविध प्रजातींचे साप आणि …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta