Friday , November 6 2026
Breaking News

१ नोव्हेंबर काळ्यादिनी बेळगाव येथील सायकल फेरी व सीमाभागातील लाक्षणिक धरणे आंदोलनाला बहुसंख्येने उपस्थित राहा

Spread the love

 

म.ए.युवा समिती सिमाभागचे आवाहन

बेळगाव : तत्कालीन केंद्र सरकारने बहुसंख्य मराठी भाषिकांच्या भावनांना तिलांजली देत १ नोव्हेंबर १९५६ रोजी कर्नाटक राज्याची निर्मिती केली, यासाठी सीमाभागातील मराठी जनता हा दिवस काळा दिन म्हणून सुतक पाळते.
याच अनुषंगाने आज महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागची बैठक पिरणवाडी येथे पार पडली, या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते पिराजी मुचंडीकर हे होते.

यावेळी बोलतांना नगरसेवक व संघटनेचे खजिनदार शिवाजी मंडोळकर यांनी ७० वर्षांपासून चालू असलेल्या लढ्याला न्याय द्यायचा असेल तर मराठी भाषिकांची एकजुट महत्वाची असून येत्या १ नोव्हेंबरला बेळगाव येथील मूक सायकल फेरीत बहुसंख्येने उपस्थिय राहून मराठी भाषिकांनी आपली ताकत दाखवून द्यावी, असे आवाहन केले.

कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी १७ जानेवारी १९५६ साली तात्कालीन केंद्र सरकारने चाळीस लाख मराठी जनतेवर अन्याय करत हा सीमाभाग मैसूर प्रांतात डांबला व १नोव्हेंबर १९५६ रोजी कर्नाटक राज्याची निर्मित केली. सीमाभागातील मराठी भाषिकांनी अनेक आंदोलने व चळवळ्या केल्या, अनेकजण हुतात्मे झाले,तुरुंगवास भोगला पण अजूनही यश आले नाही. पण येत्या १ नोव्हेंबरला कर्नाटकी सरकारचा होणारा भाषिक अत्याचार व तत्कालीन केंद्र सरकारने केलेल्या अन्यायाचा निषेध बहुसंख्येने करण्यासाठी बेळगाव येथील निषेध फेरी, खानापूर,निपाणी,बिदर,
भालकी,कारवार येथे होणाऱ्या धरणे सत्याग्रह यशस्वी करून पुन्हा एकदा आपली ताकत दाखवून देऊया असे आवाहन केले.

तसेच पुणे विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सीमावासीयांना पाठिंबा म्हणून १ नोव्हेंबरला एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्याठिकाणीही तेथील मराठी भाषिकांनी सहभाग दर्शवून आंदोलन यशस्वी करावे,असेही आवाहन करण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात पिराजी मुचंडीकर यांनी काळ्या दिनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

त्याच बरोबर युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके व सरचिटणीस मनोहर हुंदरे यांना जी अटक ऐन १ नोव्हेंबर च्या तोंडावर अटक झाली व त्यानंतर ज्या क्रिया प्रतिक्रिया उमटल्या त्याला कोणतेही उत्तर न देता माननीय न्यायालयात वकिलांच्या वतीने जामीन मंजूर करून घेणे याला प्राथमिकता देण्याचे ठरविण्यात आले. या अटकेनंतर अनेक मराठी भाषिक व समिती प्रेमींचे फोन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आले, त्यांनी या अटकेचा निषेध करत,संघटनेच्या पाठीशी असल्याचे सांगून धीर दिला त्या सर्वांचे आभार या बैठकीत मांडण्यात आले.

यावेळी अशोक घगवे, शिवाजी मंडोळकर, शिवाजी हावळानाचे, रणजित हावळानाचे, अभिजीत मजुकर, प्रवीण गुंडोजी, सुशांत देसाई, विनायक पवार, निलेश शहापूरकर, जोतिबा येळूरकर, राजू पाटील, नारायण मुचंडिकर. विजय पाटील आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *