Friday , November 6 2026
Breaking News

बेळगाव

बेळगावात सरकारविरोधात भाजपचा संताप; मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक अंत्ययात्रेला पोलिसांचा अडथळा

  बेळगाव : राज्य सरकारच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी बुधवारी बेळगावात आंदोलन करत तीव्र संताप व्यक्त केला. चन्नम्मा चौकात मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अडवले. भाजपचे राज्य उपाध्यक्ष अनिल बेनके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी रिकाम्या घागरी तसेच विविध फलक हातात घेऊन सरकारविरोधात घोषणाबाजी …

Read More »

बेळगाव महापालिकेत ‘कर्नाटक समर्थनार्थ’ ठराव मंजूर

  महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेवकांचा विरोध, सभात्याग बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत अखेर ‘कर्नाटक समर्थनार्थ’ ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. बेळगाव कर्नाटकाचा अविभाज्य भाग असल्याचे घोषित करण्यासह महाजन आयोगाचा अहवाल अंतिम असल्याचा उल्लेख असलेला हा ठराव सभेच्या अखेरच्या टप्प्यात घाईघाईने मांडण्यात आल्याने सभागृहात वाद निर्माण झाला. सभेच्या सुरुवातीपासूनच या …

Read More »

महांतेश कवटगीमठ यांना २०२६चा प्रतिष्ठित बसव पुरस्कार

  बेंगळूर : विधानपरिषदेचे माजी सदस्य महांतेश कवटगीमठ यांच्या शिक्षण व सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत बेंगळूरच्या बसव परिषदेने त्यांना २०२६चा प्रतिष्ठित बसव पुरस्कार जाहीर केला आहे. सार्वजनिक जीवनात कार्यरत असताना कवटगीमठ यांनी शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी तसेच शैक्षणिक संस्थांच्या प्रगतीसाठी योगदान दिले. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याबरोबरच सहकार …

Read More »

मराठी विद्यानिकेतन शाळेच्या खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

  बेळगाव : येथील मराठी विद्यानिकेतन शाळेच्या विद्यार्थ्यांनी खो खो, बुद्धिबळ, ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून सार्वजनिक शिक्षण खात्याच्यावतीने आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत उत्तुंग यश संपादन केले आहे. मराठी विद्यानिकेतनच्या मैदानावर झालेल्या तालुकास्तरीय खो खो स्पर्धेत माध्यमिक विभाग मुले प्रथम व मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला व प्राथमिक विभागाच्या मुलींच्या …

Read More »

प्रतिष्ठेच्या आणि अत्यंत कडक शिस्तीच्या कर्नाटक स्पर्धा परीक्षा पार पाडण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान; बेळगावात मार्गदर्शक प्रशिक्षण संपन्न

  बेळगाव : आगामी दिनांक २ आणि ४ ऑक्टोबर रोजी पार पडणाऱ्या कर्नाटक शासनाच्या स्पर्धा परीक्षांच्या पार्श्वभूमीवर, परीक्षांचे गांभीर्य आणि काटेकोर नियोजन लक्षात घेून एक उच्चस्तरीय मार्गदर्शक प्रशिक्षण वर्ग नुकताच येथील एस.जी.बी.आय.टी. (SGBIT) सेमिनार हॉलमध्ये अत्यंत शिस्तीत संपन्न झाला. स्पर्धा परीक्षांच्या पवित्र्याशी तडजोड न करता परीक्षा अतिशय संवेदनशीलतेने आणि कडक …

Read More »

नगरसेवक शाहिद खान पठाण यांच्यावर लक्ष्मी निप्पाणीकर संतापल्या

    सामान्य सभेनंतर अधिकारी-सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक; पालिका कार्यालयात काही काळ तणावाचे वातावरण बेळगाव : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विकासकामांच्या मुद्द्यावरून झालेल्या चर्चेनंतर सभा संपल्यानंतर अधिकारी आणि पालिका सदस्य यांच्यात शाब्दिक वाद झाल्याची घटना बुधवारी घडली. पालिकेच्या विकास शाखेच्या उपआयुक्त लक्ष्मी निप्पाणीकर आणि एमआयएमचे नगरसेवक शाहिद खान पठाण यांच्यात जोरदार शाब्दिक …

Read More »

शेतकऱ्यांनी पुन्हा अडवले बायपासचे काम

  कोर्टाच्या आदेशाचा दाखला; कागदपत्रे सादर करण्याची मागणी करताच ठेकेदाराने मशिनरी हटवली बेळगाव : बायपास रस्त्याच्या कामावरून शेतकरी आणि ठेकेदार यांच्यात पुन्हा वाद निर्माण झाला. हणमंत बाळेकुंद्री यांच्या शेतात ठेकेदाराकडून काम सुरू असताना संबंधित शेतकऱ्यांनी घटनास्थळी जाऊन काम थांबवले. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित जमिनीबाबत न्यायालयात दावा सुरू असून, झिरो पॉईंट निश्चित …

Read More »

वंदे मातरम्‌वरून बेळगाव महापालिका सभेत गदारोळ; महापौर संतप्त

  बेळगाव : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीलाच ‘वंदे मातरम्’च्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. त्यामुळे सभागृहातील वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले. सभेच्या प्रारंभी नाडगीतेनंतर ‘वंदे मातरम्’चे गायन करण्यात आले. राज्य सरकारच्या निर्देशानुसार ‘वंदे मातरम्’ची दोनच कडवी वाजविण्यात आली. त्यानंतर भाजपच्या सदस्यांनी उर्वरित कडवी सामूहिकरीत्या गायली. यावर विरोधी …

Read More »

मराठा समाज सुधारणा मंडळाच्या अध्यक्षपदी प्रकाश मरगाळे तर कार्याध्यक्षपदी शिवराज पाटील यांची फेरनिवड

    बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळाच्या अध्यक्षपदी प्रकाश मरगाळे तर कार्याध्यक्षपदी शिवराज पाटील यांची फेरनिवड करण्यात आली. शहापूर येथील मेलगे गल्लीतील मंडळाच्या वास्तूत झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्वानुमते 2026 ते 2031 या पाच वर्षासाठी नूतन कार्यकारिणी मंडळाची निवड करण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी प्रकाश मरगाळे होते. नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे …

Read More »

४२ तासांची विसर्जन मिरवणूक : परंपरेचा गौरव की नियोजनाचा अभाव?

    बेळगावची गणेशोत्सवाची परंपरा भव्य, उत्साही आणि अभिमानास्पद आहे. गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या हजारो नागरिकांचा उत्साह, भक्ती आणि जल्लोष हा या परंपरेचा अविभाज्य भाग आहे. मात्र यंदाची विसर्जन मिरवणूक तब्बल ४२ तास चालली, ही बाब केवळ अभिमानाने सांगण्यापुरती न राहता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आणणारी आहे. मिरवणूक भव्य …

Read More »