Monday , October 5 2026
Breaking News

वंदे मातरम्‌वरून बेळगाव महापालिका सभेत गदारोळ; महापौर संतप्त

Spread the love

 

बेळगाव : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीलाच ‘वंदे मातरम्’च्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. त्यामुळे सभागृहातील वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले.

सभेच्या प्रारंभी नाडगीतेनंतर ‘वंदे मातरम्’चे गायन करण्यात आले. राज्य सरकारच्या निर्देशानुसार ‘वंदे मातरम्’ची दोनच कडवी वाजविण्यात आली. त्यानंतर भाजपच्या सदस्यांनी उर्वरित कडवी सामूहिकरीत्या गायली. यावर विरोधी सदस्यांनी आक्षेप घेतल्याने सत्ताधारी व विरोधी सदस्यांमध्ये शाब्दिक वाद झाला.

या प्रकारामुळे महापौर प्रीती कामकर संतप्त झाल्या. दोनच कडवी वाजविणाऱ्या ऑपरेटरवर त्यांनी नाराजी व्यक्त करत त्याला कामावरून हटविण्याची सूचना केली.

दरम्यान, उपमहापौर हनुमंत कोंगाली यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, ‘वंदे मातरम्’ पूर्णपणे वाजविण्याबाबत श्रेयस नायक यांनी महापालिका आयुक्तांना पत्र दिले होते. मात्र, सरकारच्या निर्देशानुसार केवळ दोन कडवी वाजविण्यात येतील, असे आयुक्तांनी लेखी उत्तर दिले होते. त्यामुळे सरकारी निर्देशानुसार दोन कडवी वाजविण्यात आली आणि त्यानंतर सदस्यांनी उर्वरित कडवी गायली, असे त्यांनी स्पष्ट केले.

About Belgaum Varta

Check Also

आयएमएच्या बेळगाव शाखाध्यक्षपदी डॉ. सविता कद्दू, सचिव पदी डॉ. माधव प्रभू

Spread the love  बेळगाव : इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) च्या बेळगाव शाखेच्या नूतन अध्यक्षपदी डॉ. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *