Sunday , September 20 2026
Breaking News

बेळगाव

श्री. वैजनाथ मंदिरासाठी मिथील जाधव यांच्याकडून तीन लाख रुपयांची चौकटची देणगी

    बेळगाव : श्रीक्षेत्र वैजनाथ (ता. चंदगड) येथील मंदिराचे जिर्णोदराचे काम प्रगतीपथावर सुरू असून अंतिम टप्प्यात आलेले आहे. या मंदिरासाठी उचगाव (ता. बेळगाव) येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे उचगाव विभाग प्रमुख आणि सामाजिक कार्यकर्ते मिथिल बाळू जाधव यांनी मंदिरासाठी सागवान लाकडाची तीन लाख रुपयेची चौकट देणगी दाखल दिली सदर चौकट दांडेली …

Read More »

स्वातंत्र्यदिनाची अनोखी भेट; फेसबुक फ्रेंड्स सर्कलचा दुर्गम जंगलातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात

  बेळगाव : स्वातंत्र्यदिन देशभरात उत्साहात साजरा होत असताना, फेसबुक फ्रेंड्स सर्कलने मात्र या राष्ट्रीय सणाला सामाजिक बांधिलकीची जोड देत दुर्गम जंगलभागातील विद्यार्थ्यांना अनोखी भेट दिली. तिलारी परिसरातील स्वप्नवेल येथील धनगरवाडी, धामणे (एस) येथील सरकारी मराठी लोअर प्राथमिक शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक व दैनंदिन उपयोगाचे साहित्य वितरित करण्यात आले. घनदाट …

Read More »

विद्यानगर अनगोळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची कार्यकारिणी जाहीर

  अमित हलगेकर अध्यक्ष, श्याम गौंडाडकर उपाध्यक्ष; सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल बेळगाव : विद्यानगर, अनगोळ येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाची सन २०२६-२७ साठी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. मंडळाचे यंदाचे ४९ वे वर्ष असून आगामी काळात सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे मंडळाची वाटचाल सुरू आहे. परंपरेला आधुनिकतेची आणि नव्या विचारांची जोड …

Read More »

भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ; ७५ वर्षीय वृद्धावर जीवघेणा हल्ला

  महांतेश नगरमध्ये संतापजनक घटना; पाय व मांडीला सात-आठ वेळा चावा, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव बेळगाव : शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महांतेश नगर येथे रविवारी एका ७५ वर्षीय वृद्धावर भटक्या कुत्र्याने अचानक हल्ला केला. कुत्र्याने त्यांच्या पायासह मांडीला सात-आठ वेळा चावा …

Read More »

नागपंचमी दिवशीच विषारी सापाचा दंश; रुग्णालयात नेत असतानाच महिलेचा मृत्यू

  रायबाग : शेतात कचरा काढण्याचे काम करत असताना विषारी सापाने दंश केल्याने एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रायबाग शहरात घडली. साप चावल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात नेत असतानाच महिलेने वाटेतच अखेरचा श्वास घेतला. मृत महिलेचे नाव सत्यव्वा शिवानंद शिंगे (वय 43) असे असून त्या रायबाग शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर …

Read More »

एसटी समाजाच्या हक्काच्या पैशांचा हिशोब द्यावाच लागेल : डॉ. सोनाली सरनोबत

  बेळगाव : कर्नाटक महर्षी वाल्मीकी अनुसूचित जमाती विकास महामंडळातील निधीच्या कथित गैरव्यवहार आणि मनी लाँडरिंग प्रकरणावरून भाजप महिला मोर्चाच्या कर्नाटक सचिव डॉ. सोनाली सरनोबत यांनी सरकारवर टीका केली आहे. “एसटी समाजाच्या हक्काच्या पैशांचा एक-एक रुपयाचा हिशोब जनतेला द्यावाच लागेल,” अशी मागणी त्यांनी केली. महामंडळाच्या निधीतील सुमारे 89.62 कोटी रुपयांचा …

Read More »

वारुळाला जाऊया… नागोबाला पुजूया! भक्ती, श्रद्धा आणि परंपरेने रंगली नागपंचमी

  बेळगाव : श्रावणाच्या पवित्र महिन्याची सुरुवात होताच वातावरणात भक्तीचा सुगंध दरवळू लागतो आणि सण-उत्सवांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीतील श्रद्धेचे दर्शन घडते. याच मंगलमय वातावरणात ‘वारुळाला जाऊया… नागोबाला पुजूया!’ असा भक्तिभाव मनात घेऊन श्रावणातील पहिला सण असलेली नागपंचमी बेळगाव शहर व परिसरात अत्यंत श्रद्धा, भक्तिभाव आणि पारंपरिक उत्साहात साजरी करण्यात आली. …

Read More »

मराठी शाळांना डावलाल तर गप्प बसणार नाही!

  शिक्षक भरतीत मराठी माध्यमासाठी जागांची मागणी; खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे उद्या डीडीपीआय कार्यालयावर धडक आंदोलन बेळगाव : कर्नाटक शासनाच्या आगामी शिक्षक भरती प्रक्रियेत मराठी माध्यमाच्या शाळांसाठी आवश्यक जागांची तरतूद न करण्यात आल्याने सीमाभागातील मराठी भाषिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. मराठी शाळांना शिक्षकांपासून वंचित ठेवून त्यांचे अस्तित्वच धोक्यात …

Read More »

बेळगावच्या राजाचे ‘श्री गणेश खांब मुहूर्तमेढ पूजन’ उत्साहात संपन्न

  बेळगाव : सीमाभागातील लाखो गणेशभक्तांचे श्रद्धास्थान आणि नवसाला पावणारा बाप्पा अशी ख्याती असलेल्या बेळगावच्या राजाच्या २०२६ सालच्या गणेशोत्सवाची अधिकृत तयारी सुरू झाली आहे. प्रतिवर्षाप्रमाणे रविवार, दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी बेळगावचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने क्रांतिसिंह नाना पाटील चौक, चव्हाट गल्ली येथे ‘श्री गणेश खांब मुहूर्तमेढ पूजन’ पारंपरिक …

Read More »

उचवडे महात्मा फुले वाचनालयातर्फे एस. एस. निंगाणी यांचा सत्कार

  उचवडे : उचवडे (ता. खानापूर) येथील महात्मा जोतिबा फुले सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने बेळगावचे उप वनसंरक्षक (डीसीएफ) एस. एस. निंगाणी यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. वाचनालयाचे अध्यक्ष शिवाजी हसनेकर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन निंगाणी यांचा गौरव करण्यात आला. एस. एस. निंगाणी हे 42 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले …

Read More »