जून-जुलै-ऑगस्टचे वेतन थकीत; आर्थिक अडचणींचा सामना, सणासुदीपूर्वी मानधन देण्याची मागणी बेळगाव : सरकारी शाळांमधील रिक्त शिक्षकांच्या जागांवरील अध्यापनाचा भार सांभाळणाऱ्या अतिथी शिक्षकांचे गेल्या तीन महिन्यांपासून मानधन रखडले आहे. नवीन शैक्षणिक वर्षाला तीन महिने उलटूनही जून, जुलै आणि ऑगस्टचे मानधन मिळाले नसल्याने अतिथी शिक्षक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. मानधन …
Read More »गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौर व मनपा आयुक्तांकडून विसर्जन मार्गांची पाहणी
बेळगाव : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक मार्गांवरील विविध नागरी सुविधांचा आढावा घेण्यासाठी महापौर प्रीती कामकर आणि महानगरपालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी गुरुवारी शहरातील प्रमुख मार्गांची पाहणी केली. महापौर, मनपा आयुक्त व कर्मचाऱ्यांनी प्रारंभी कपिलेश्वर तलाव परिसरात पूजा केली. त्यानंतर महापौर प्रीती कामकर यांनी राणी चन्नम्मा चौक, …
Read More »दिनेश मुधाळे यांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांची घेतली भेट; शुभम शेळके यांनी फोनवरून मांडली सीमावासीयांची व्यथा
मुंबई : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे उपाध्यक्ष तथा भालकी तालुकाध्यक्ष दिनेश मुधाळे यांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांची भेट घेऊन सीमाभागातील मराठी जनतेची व्यथा आणि गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेल्या संघर्षाची वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांनीही देशपांडे यांच्याशी …
Read More »श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त बेळगावमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन
बेळगाव : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त बेळगावमधील आरपीडी कॉलेजसमोरील श्रीकृष्ण मठात विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त ४ सप्टेंबर रोजी उपवास ठेवण्यात येणार आहे. भगवान श्रीकृष्णाची लक्ष तुळशी अर्चना सकाळी ८ वाजता होईल आणि सकाळी ११:३० वाजता समाप्त होईल. विविध भजन मंडळांद्वारे दुपारी १२ वाजल्यापासून हरी …
Read More »शिक्षकांनी दिला ‘जीवनदानाचा’ धडा!
शिक्षक दिनानिमित्त जिल्हा पंचायतीचे रक्तदान अभियान; जिल्हाभरात शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग बेळगाव : विद्यार्थ्यांना आयुष्यभर ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या शिक्षकांनी शिक्षक दिनानिमित्त आता रक्तदानातून ‘जीवनदानाचा’ आदर्श घालून दिला आहे. बेळगाव जिल्हा पंचायतीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, नोंदणी केलेल्या शिक्षकांसह शासकीय अधिकारी-कर्मचारी, विविध संघटनांचे पदाधिकारी व …
Read More »मार्कंडेय नदीकाठाला कचऱ्याचा विळखा; धार्मिकतेच्या नावाखाली पर्यावरणाची हेळसांड
कंग्राळी खुर्द हद्दीत पूजेचे साहित्य, प्लास्टिक व ओला-सुका कचरा नदीत; कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईची मागणी बेळगाव : धार्मिक श्रद्धा जपत असताना पर्यावरण संवर्धनाची जबाबदारीही नागरिकांनी ओळखण्याची गरज निर्माण झाली आहे. कंग्राळी खुर्द गावाच्या हद्दीत मार्कंडेय नदीकाठासह नदीवरील पुलाजवळ मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून, पूजेचे साहित्य, फळे-फुले, नैवेद्य, प्लास्टिकच्या पिशव्या …
Read More »नवनियुक्त पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांचे मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाकडून स्वागत
बेळगाव : बेळगाव शहराचे नवनियुक्त पोलीस आयुक्त श्री. प्रकाश निकम यांनी आज आपल्या पदाचा अधिकृत कार्यभार स्वीकारला. त्यांच्या या पहिल्याच दिवशी मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने त्यांचे बेळगाव नगरीत अत्यंत उत्साहात स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन स्वागत महामंडळाचे अध्यक्ष माननीय श्री. रमाकांत (दादा) कोंडुसकर यांनी नवीन …
Read More »प्रकाश निकम यांनी स्वीकारला पोलीस आयुक्त पदाचा पदभार
बेळगाव : बेळगाव शहर पोलीस आयुक्तपदाच्या बदलीवरून सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला असून, नूतन पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी आज अधिकृतपणे पदभार स्वीकारला. पोलीस आयुक्तालयात आगमन होताच त्यांचे मानाच्या सलामीने स्वागत करण्यात आले. यानंतर प्रकाश निकम यांनी बेळगाव शहराचे नूतन पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. धारवाड येथे बदली …
Read More »गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे आयोजित विविध स्पर्धांचा निकाल जाहीर; ६६७ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे रविवार, दि. २३ ऑगस्ट रोजी मराठी व्याकरण, मराठी हस्ताक्षर व मराठी निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या विविध स्पर्धांमध्ये तब्बल ६६७ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला असून, यशस्वी विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. निबंध स्पर्धा – …
Read More »प्रकाश निकम आज स्वीकारणार पोलीस आयुक्त पदाची सूत्रे
भूषण बोरसे आज सोपवणार पदभार बेळगाव : गणेशोत्सवामुळे लांबलेली बेळगाव शहर पोलीस आयुक्तपदाच्या पदभार हस्तांतरणाची प्रक्रिया अखेर गुरुवारी पूर्ण होणार आहे. २०१२ बॅचचे आयपीएस अधिकारी प्रकाश अमृत निकम आज बेळगाव शहराच्या पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारणार असून, मावळते आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे त्यांच्याकडे पदभार सोपवणार आहेत. राज्य सरकारने २९ ऑगस्ट …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta