Sunday , September 20 2026
Breaking News

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौर व मनपा आयुक्तांकडून विसर्जन मार्गांची पाहणी

Spread the love

 

बेळगाव : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक मार्गांवरील विविध नागरी सुविधांचा आढावा घेण्यासाठी महापौर प्रीती कामकर आणि महानगरपालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी गुरुवारी शहरातील प्रमुख मार्गांची पाहणी केली.

महापौर, मनपा आयुक्त व कर्मचाऱ्यांनी प्रारंभी कपिलेश्वर तलाव परिसरात पूजा केली. त्यानंतर महापौर प्रीती कामकर यांनी राणी चन्नम्मा चौक, समादेवी गल्ली, मारुती गल्ली, गणपती गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, संभाजी चौक, टिळक चौक, हेमू कलानी चौक, मार्केट परिसरासह अन्य प्रमुख विसर्जन मिरवणूक मार्गांची पाहणी करून तेथील सुविधांचा आढावा घेतला.

यावेळी महापौर प्रीती कामकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. गणेशोत्सव काळात नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, स्वच्छता व्यवस्था, वीज वाहिन्यांची दुरुस्ती व इतर आवश्यक कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी एल अँड टी, हेस्कॉमसह सर्व संबंधित विभागांना २४ तास काम करून आवश्यक व्यवस्था पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार विविध ठिकाणी कामे वेगाने सुरू असल्याचेही त्या म्हणाल्या.

महानगरपालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गणेशोत्सव पूर्वतयारी बैठकीत ठरविण्यात आलेल्या निर्णयांनुसार महानगरपालिका व विविध विभागांना कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विसर्जन मिरवणूक मार्गांवरील समस्या तातडीने दूर करून उत्सवासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.

या पाहणीवेळी सत्ताधारी पक्षाचे नेते संतोष पेडणेकर, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रेयस नाकाडी, राजू भातकांडे, नितीन जाधव, गिरीश धोंगडी, आनंद चौहान, रेश्मा कामकर, वैशाली भातकांडे यांच्यासह अन्य नगरसेवक, विकास विभागाच्या उपआयुक्त लक्ष्मी निपाणीकर तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *