Sunday , September 20 2026
Breaking News

बेळगाव

ध्येय निश्चित करा व त्यावर ठाम रहा यश आपलेच : डॉ.उमेश कळेकर

  मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा उत्साहात  बेळगाव : शिक्षण घेऊन यंत्रवत जगण्यापेक्षा मोठी स्वप्ने बघून ती पूर्ण करण्याकडे प्रयत्न करा त्यासाठी ध्येय निश्चित करा व त्यावर ठाम रहा यश आपलेच आहे, असे प्रतिपादन डॉ. उमेश कळेकर यांनी केले. मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे मराठा समाजातील …

Read More »

शिंदोळी परिसरात हातभट्टी दारू विक्रीवर मारिहाळ पोलिसांचा छापा; २० लिटर दारू जप्त

  बेळगाव : मारिहाळ पोलिसांनी शिंदोळी परिसरात हातभट्टी दारूच्या अवैध विक्रीवर धडक कारवाई करत सुमारे २० लिटर हातभट्टी दारू जप्त केली असून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. ११ जुलै रोजी होळेप्पा लक्ष्मण पुजारी (वय ४०, रा. मुतगा रोड, बेळगाव) हा शिंदोळी-मुतगा मार्गावरील शेताकडे जाणाऱ्या रस्त्यालगत उभारलेल्या तात्पुरत्या शेडमध्ये स्वतःच्या आर्थिक …

Read More »

सीसीटीव्हीच्या आधारे हिट-अँड-रन प्रकरणाचा छडा; टिप्पर चालक अटकेत

  बेळगाव : मारिहाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिट-अँड-रन अपघात प्रकरणाचा सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक आणि वैज्ञानिक तपासाच्या आधारे यशस्वी छडा लावत पोलिसांनी टिप्पर चालकाला ताब्यात घेतले आहे. 1 जुलै 2026 रोजी पहाटे 4.00 ते 5.30 वाजण्याच्या दरम्यान बेळगाव-गोकाक मार्गावरील मुचंडी गावाजवळील घसारी फळ विक्री केंद्रासमोर पायी जात असलेल्या राजू रामा …

Read More »

कै. वरद किरण पाटील यांच्या स्मरणार्थ डेंगू लसीकरण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

  बेळगाव : श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कपीलेश्वर चौक, बेळगाव यांच्या वतीने तसेच समाजसेवक कपिल भोसले यांच्या सहकार्याने कै. वरद किरण पाटील यांच्या स्मरणार्थ डेंगू लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अशोक जाधव, उपाध्यक्ष आकाश हुल्लीयार …

Read More »

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी; सामाजिक कार्यकर्ते शाम पाटील यांचे आवाहन

    बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेशी संबंधित घडलेल्या एका खेदजनक घटनेच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते व समाजप्रबोधनकर्ता शाम पाटील यांनी नागरिकांना महाराजांच्या प्रतिमेचा आणि विचारांचा सन्मान राखण्याचे आवाहन केले आहे. प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात शाम पाटील यांनी म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे आराध्य दैवत नसून संपूर्ण …

Read More »

बेळगावात संघाच्या अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठकीचा समारोप; संघ विस्तार, सामाजिक उपक्रमांसह राममंदिर दानपेटी प्रकरणावरही चर्चा

  बेळगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) अखिल भारतीय प्रांत प्रचारकांच्या वार्षिक बैठकीचा रविवारी बेळगाव येथे समारोप झाला. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांच्यासह देशभरातील २२६ वरिष्ठ पदाधिकारी या तीन दिवसीय बैठकीत सहभागी झाले. बैठकीत संघाच्या आगामी वर्षातील कार्याचा आराखडा, शाखा विस्तार, शताब्दी वर्षातील उपक्रम, प्रशिक्षण वर्ग आणि …

Read More »

रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे हिंदू रुद्रभूमीत पाण्याच्या टाकीचे लोकार्पण

    बसवन कुडचीतील मोक्षधामात समाजोपयोगी प्रकल्प शाश्वत सेवा उपक्रमाला विविध संस्थांचे सहकार्य बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणने केएलई व्ही. के. इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेसच्या एनएसएस विभाग आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ बेळगाव उदान यांच्या सहकार्याने बसवन कुडची येथील हिंदू रुद्रभूमी (मोक्षधाम) येथे पाण्याच्या टाकीची उभारणी करून ती लोकार्पित …

Read More »

येळ्ळूरमध्ये समाज सारथी संघटनेचे वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

    येळ्ळूर : येथील समाज सारथी सेवा संघटनेच्या वतीने रविवारी (दि. १२) रोजी नेताजी भवन परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. संघटनेचे अध्यक्ष प्रा. सी. एम. गोरल यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी संघटनेचे सदस्य …

Read More »

मुसळधार पावसाऐवजी पावसाच्या कमतरतेमुळे काही ठिकाणी पिकांचे नुकसान; पाहणीनंतर मदतीचा निर्णय : मंत्री सतीश जारकीहोळी

  बेळगाव : पावसाच्या कमतरतेमुळे राज्यातील काही भागांत पिकांचे नुकसान झाल्याची माहिती असून, संबंधित अधिकाऱ्यांकडून पंचनामा व पाहणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदत व आवश्यक उपाययोजनांबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली. चिक्कोडी येथे रविवारी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, राज्यातील इतर भागांच्या …

Read More »

पावसाच्या उसंतीने शेतात लगबग; कोळपणी-भांगलणीच्या कामांना वेग

      बेळगाव : परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने थोडी उसंत दिल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील कोळपणी व भांगलणीच्या कामांना वेग दिला आहे. भातासह विविध पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेली ही कामे सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू असून शेतांमध्ये पुन्हा एकदा लगबगीचे वातावरण निर्माण झाले आहे. खरीप हंगामाच्या प्रारंभी शेतकरी मशागत, शेणखताचा …

Read More »