बेळगाव : पांगुळ गल्ली व भातकांडे गल्लीला गणपत गल्लीशी जोडणाऱ्या भंगी रस्त्यावरील सुमारे २० ते २५ वर्षांपूर्वी कोसळलेल्या जुन्या इमारतीचा ढिगारा अखेर हटवून परिसराची स्वच्छता करण्यात आली. या कामामुळे अनेक वर्षांपासून नागरिकांना भेडसावणारा अस्वच्छतेचा प्रश्न निकाली निघाला. कोसळलेल्या इमारतीचा मलबा रस्त्यावरच पडून असल्याने त्या ठिकाणी कचरा, खराब कपडे आणि …
Read More »कुद्रेमानी महालक्ष्मी यात्रा २०२८ साली भरविण्याचा ग्रामस्थांचा निर्णय
कुद्रेमानी (प्रतिनिधी) : कुद्रेमानी गावची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीची यात्रा सन २०२८ मध्ये भरविण्यात येणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ग्रामस्थांच्या बैठकीत हनुमान मंदिर येथे एकमताने घेण्यात आला. या निर्णयामुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून यात्रेच्या नियोजनाला सुरूवात झाली आहे. ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महालक्ष्मी मंदिराचे अलीकडील काळात नव्याने बांधकाम …
Read More »ऐतिहासिक निर्णय : ‘जय किसान’ प्रकरणाला उच्च न्यायालयाकडून दिलासा; KAT समोर २७ जुलै रोजी गुणवत्तेवर सुनावणी
बेळगाव : जय किसान होलसेल व्हेजिटेबल मर्चंट असोसिएशनच्या कायदेशीर लढ्याला आज महत्त्वपूर्ण यश मिळाले. धारवाड येथील माननीय कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने प्रकरणातील विलंब माफ करत पुढील सुनावणीचा मार्ग मोकळा केला. आज सायंकाळी सुमारे ४.४५ वाजता सुरू झालेल्या सुनावणीत जवळपास दीड तास दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाला. …
Read More »एसआयआर मोहिमेचा शिक्षकांवर वाढता ताण; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची भीती
बेळगाव : सरकारी शाळांमधील घटती पटसंख्या आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे वाढते आव्हान यामध्येच शिक्षकांवर सातत्याने वाढत असलेल्या अशैक्षणिक कामांच्या ओझ्यामुळे शिक्षण व्यवस्थेसमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विविध शासकीय सर्वेक्षणे, प्रशासकीय कामे आणि आता विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षण (एसआयआर) मोहिमेची जबाबदारी शिक्षकांवर सोपविण्यात आल्याने अध्यापनासाठी मिळणारा वेळ लक्षणीयरीत्या कमी …
Read More »बेळगावच्या पाणीटंचाईसाठी तिलारीचे अतिरिक्त पाणी राकसकोपला वळविण्याची मागणी
माजी नगरसेवक संघटनेचे आमदार शिवाजीराव पाटील यांना निवेदन बेळगाव : शहरातील वाढत्या पाणीटंचाईच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तिलारी धरणातील अतिरिक्त पाणी मार्कंडेय नदीमार्गे राकसकोप जलाशयात वळविण्याची मागणी बेळगाव महानगरपालिकेच्या माजी नगरसेवक संघटनेने केली आहे. यासंदर्भात संघटनेच्या शिष्टमंडळाने चंदगड मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. …
Read More »सोनम वांगचूक यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी बेळगांवात उद्या निदर्शने
बेळगांव : नीट व इतर परिक्षांतील गोंधळ आणि त्याला जबाबदार असलेले केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी जागतिक कीर्तीचे पर्यावरणवादी सोनम वांगचूक यांनी दिल्लीत जंतरमंतर येथे गेल्या अठरा दिवसांपासून उपोषण सुरु केले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी व प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी बुधवार दि. १५ रोजी सायंकाळी …
Read More »मराठी शाळांमधील कन्नड सक्ती व मराठी पाठ्यपुस्तकांची अनुपलब्धता याची केंद्रीय स्तरावर दखल
केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाचे कर्नाटक सरकारला निर्देश बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील मराठी भाषिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि भाषिक हक्कांवर गदा आणली जात असल्याच्या तक्रारीची भाषिक अल्पसंख्यांक आयोगाच्या वतीने गंभीर दखल घेण्यात आली आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने मागील महिन्यात बेळगावच्या जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना मराठी शाळांमधील कन्नड सक्ती थांबवणे आणि मराठी …
Read More »आंतरराज्यीय दोन सराईत घरफोडे चोर अटकेत, 4.18 लाखांचे दागिने जप्त
बेळगाव : बेळगावच्या माळमारुती पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत महाराष्ट्रातील दोन सराईत आंतरराज्यीय चोरांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून ₹4.18 लाख किमतीचे सोने-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मोहन दौलतराव मुंडे (वय 33) आणि श्याम साहेबराव जाधव (वय 30) अशी असून, …
Read More »गोडसेवाडीतील २८ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता; माहिती असल्यास संपर्काचे आवाहन
बेळगाव : गोडसेवाडी-टिळकवाडी येथील २८ वर्षीय विवाहित महिला गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असून, तिचा शोध सुरू आहे. याप्रकरणी तिचे पती पवन हणमशेट यांनी टिळकवाडी पोलीस स्थानकात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. बेपत्ता महिलेचे नाव सुश्मिता पवन हणमशेट (वय २८, रा. गोडसेवाडी-टिळकवाडी) असे आहे. बुधवार, दि. ८ जुलै रोजी …
Read More »‘ज्ञानोबा-तुकाराम’ आणि ‘विठ्ठल’ नामाच्या गजरात येळ्ळूर येथील वैष्णव सदन आश्रम दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान!
येळ्ळूर : हाती भगव्या पताका, टाळ-मृदुंगाचा अखंड गजर, डोक्यावर तुळशीवृंदावन घेतलेल्या माऊली आणि मुखात विठ्ठलाचे नामस्मरण… अशा अत्यंत भक्तीमय आणि उत्साही वातावरणात वैष्णव सदन आश्रम (येळ्ळूर-धामणे) ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी आणि पालखी सोहळ्याचे आज सकाळी थाटात प्रस्थान झाले. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव सीमाभागातील शेकडो वारकरी विठूरायाच्या दर्शनासाठी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta