Sunday , September 20 2026
Breaking News

भंगी रस्ता अखेर स्वच्छ; २५ वर्षांपासूनचा नागरिकांचा प्रश्न मार्गी

Spread the love

 

बेळगाव : पांगुळ गल्ली व भातकांडे गल्लीला गणपत गल्लीशी जोडणाऱ्या भंगी रस्त्यावरील सुमारे २० ते २५ वर्षांपूर्वी कोसळलेल्या जुन्या इमारतीचा ढिगारा अखेर हटवून परिसराची स्वच्छता करण्यात आली. या कामामुळे अनेक वर्षांपासून नागरिकांना भेडसावणारा अस्वच्छतेचा प्रश्न निकाली निघाला.

कोसळलेल्या इमारतीचा मलबा रस्त्यावरच पडून असल्याने त्या ठिकाणी कचरा, खराब कपडे आणि इतर घाण साचत होती. तसेच काहीजणांकडून उघड्यावर लघवी केली जात असल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यूसह विविध साथीच्या रोगांचा धोका वाढला होता. या रस्त्यावरून ये-जा करणेही नागरिकांसाठी अत्यंत त्रासदायक झाले होते.

या समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी अनेक वेळा महानगरपालिकेकडे तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांनी आमदार राजू शेट यांच्याकडे हा प्रश्न मांडला. त्यांच्या निर्देशानुसार महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जागेची पाहणी करून आज सकाळी संपूर्ण रस्ता स्वच्छ केला.

यावेळी अनंत कुचेकर, महादेव अनगोलकर, निहाल शहापूरकर, श्रीकांत कडोलकर, विनोद बेळगावकर, श्री. लोहार, विजय लोहार, राजू गोडसे, उदय सिद्धनावर यांच्यासह गल्लीतील अनेक नागरिक उपस्थित होते. नागरिकांनी रस्ता स्वच्छ केल्याबद्दल समाधान व्यक्त करत परिसराची नियमित स्वच्छता राखण्याची मागणीही केली.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *