Monday , September 21 2026
Breaking News

गोडसेवाडीतील २८ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता; माहिती असल्यास संपर्काचे आवाहन

Spread the love

 

बेळगाव : गोडसेवाडी-टिळकवाडी येथील २८ वर्षीय विवाहित महिला गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असून, तिचा शोध सुरू आहे. याप्रकरणी तिचे पती पवन हणमशेट यांनी टिळकवाडी पोलीस स्थानकात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे.

बेपत्ता महिलेचे नाव सुश्मिता पवन हणमशेट (वय २८, रा. गोडसेवाडी-टिळकवाडी) असे आहे. बुधवार, दि. ८ जुलै रोजी सायंकाळी सुमारे ६ ते ६.३० वाजण्याच्या सुमारास त्या कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडल्या. त्यानंतर त्या अद्याप घरी परतल्या नसल्याने कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली.

सुश्मिता यांची उंची सुमारे ५ फूट, गोरा वर्ण, गोल चेहरा, लांब नाक आणि सुदृढ बांधा अशी शारीरिक ओळख आहे. त्यांच्या उजव्या हातावर श्रीरामाचे चित्र गोंदवलेले असून त्याखाली “श्रीराम” असे लिहिलेले आहे.

या महिलेबाबत कोणाला कोणतीही माहिती मिळाल्यास ९४८०८०४०५२ या क्रमांकावर किंवा जवळच्या पोलीस स्थानकाशी तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन टिळकवाडी पोलिसांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *