Saturday , November 7 2026
Breaking News

आंतरराज्यीय दोन सराईत घरफोडे चोर अटकेत, 4.18 लाखांचे दागिने जप्त

Spread the love

 

बेळगाव : बेळगावच्या माळमारुती पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत महाराष्ट्रातील दोन सराईत आंतरराज्यीय चोरांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून ₹4.18 लाख किमतीचे सोने-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मोहन दौलतराव मुंडे (वय 33) आणि श्याम साहेबराव जाधव (वय 30) अशी असून, दोघेही महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील रहिवासी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी बेळगावच्या श्रीनगर परिसरातील एका घरातून सोने-चांदीचे दागिने चोरले होते. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढत त्यांना अटक केली.

पोलिसांनी आरोपींकडून 1.617 किलो वजनाचे सुमारे ₹3.88 लाख किमतीचे चांदीचे दागिने तसेच ₹30 हजार किमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण ₹4.18 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

तपासादरम्यान आरोपी महाराष्ट्रातील बीड, लातूर, पुणे, सोलापूर, विजयपूर तसेच इतर जिल्ह्यांतील 50 हून अधिक घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे उघड झाले आहे. कर्नाटकमधील हा त्यांचा पहिलाच गुन्हा असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली माळमारुती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस कर्मचारी, फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि तांत्रिक पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. गुन्ह्याचा यशस्वी उलगडा केल्याबद्दल पोलीस आयुक्तांनी संपूर्ण पथकाचे कौतुक केले.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *