Sunday , September 20 2026
Breaking News

दुर्गंधीयुक्त पाण्याचा होणार निपटारा

Spread the love

 

तहसीलदार, तालुका पंचायतकडून पाहणी; रयत संघटनेच्या प्रयत्नाला यश

निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील समुदायभवनापासून येणारे गटारीचे पाणी रस्त्या वरून वाहत आहे. त्याची विल्हेवाट मुख्य गटारीत न केल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत वारंवार निवेदन देऊनही कोणतीच कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांनी अखेर कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन समस्या सोडविण्याची मागणी केली केली होती. त्यानुसार मंगळवारी (ता.१४) दुपारी तहसीलदार सुरेश मुंजे, तालुका पंचायत अधिकारी प्रवीण कट्टी, मंडळ पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार यांच्यासह पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आठवड्याभरात सांडपाण्यासह हुन्नरगी रोडवरील कॅनॉल जवळील पाण्याला वाट करून देण्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या आंदोलनाला यश मिळाले आहे. यावेळी कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांचीही उपस्थिती होती.
ग्रामपंचायतीने बेनाडी गावातील मुख्य रस्त्यावर मांग वाड्यातील गटाराचे पाणी पुढे वाहून जाण्यासाठी मार्ग तयार केला नाही. त्यामुळे पाणी मुख्य रस्त्यावर येते. शेजारीच शाळा असून रस्त्यावरही वाहनांच्या वाहतुकीची वर्दळ आहे. त्यामुळे आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. या बाबत गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी पंचायतीला कळवले होते. पर्यावरणासह आरोग्याचा धोका आहे. ग्रामस्थांनी पंचायतीला लेखी स्वरूपात कळवूनही त्याकडे दुर्लक्ष झाले होते. परंतु त्याची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे काम न झाल्यास धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
काहींनी कालवा अडविल्याने पावसाळ्यात कालव्याचे पाणी ओढ्यात न जाता मागासवर्गीय नागरिकांच्या शेतात जाऊन नुकसान झाले. याबद्दल सिंचन विभागाकडे चौकशी केली असता गावातील गटाराचे पाणी कालव्यात येते. या पाण्याचाही निचरा करून देण्याचे आश्वासन पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसह पीडिओ तलाठी आणि सेक्रेटरी यांनी दिली आहे.
यावेळी अशोक क्षीरसागर, कलगोंडा कोटगे, आनंदा गायकवाड, सुरेश चंदुरे, मल्लेश बन्ने, सचिन कोटगे, महेश क्षीरसागर, मयूर पाटील, सिद्धाप्पा मिरजे, महेश जनवाडे, काशिनाथ सांगावे, आप्पासाहेब मिरजे, सागर पाटील, प्रकाश नुले, तिपान्ना कॉनगे, आप्पासाहेब पाटील, बाबासाहेब पाटील, आनंदा देशिंगे, गुरुनाथ तेली, पीडिओ जावेद पटेल, तलाठी दयानंद तोडकर, पाटबंधारे खात्याचे अभियंते सी. एस. कुलकर्णी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी व नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *