Sunday , September 20 2026
Breaking News

सोनम वांगचूक यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी बेळगांवात उद्या निदर्शने

Spread the love

 

बेळगांव : नीट व इतर परिक्षांतील गोंधळ आणि त्याला जबाबदार असलेले केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी जागतिक कीर्तीचे पर्यावरणवादी सोनम वांगचूक यांनी दिल्लीत जंतरमंतर येथे गेल्या अठरा दिवसांपासून उपोषण सुरु केले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी व प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी बुधवार दि. १५ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता धर्मवीर संभाजी चौक, किर्लोस्कर रोड येथे निदर्शने आयोजित करण्यात आली आहेत. प्रगतिशील लेखक संघ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती बेळगांव व संलग्न संस्थांच्या वतीने हे आंदोलन होणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रा. आनंद मेणसे व निला आपटे यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *