Sunday , September 20 2026
Breaking News

बुधवारच्या सामाजिक न्यायाच्या लढ्यात सहभागी होण्याचे मानव अधिकार संघटनेतर्फे आवाहन

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बुधवारी (ता. १५) पासून निपाणी शहरातील नागरिकांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी फोर जे-आर ह्युमन राईट्स मानव अधिकार संघटनेतर्फे तहसीलदार कार्यालयात लोकशाही मार्गाने उपोषण करण्यात येणार आहे.
हा लढा कोणत्याही एका व्यक्तीचा, एका संघटनेचा किंवा काही मोजक्या लोकांचा नाही. हा लढा निपाणी शहरातील प्रत्येक सामान्य नागरिकाच्या हक्कांचा, मूलभूत गरजांचा आणि न्यायाच्या अपेक्षांचा लढा आहे. अनेक नागरिक विविध समस्यांना सामोरे जात आहेत. पाणी, नागरी सुविधा, प्रशासनाकडून अपेक्षित असलेले सहकार्य आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न केवळ कागदावर न राहता त्यावर ठोस निर्णय व्हावा, यासाठी हा आवाज उठवला जात आहे. फोर जे-आर ह्युमन राईट्स मानव अधिकार संघटना नेहमीच सामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी, अन्यायाविरोधात आणि समाजहितासाठी कार्य करत आली आहे. नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवणे आणि त्यावर योग्य तो तोडगा निघावा, यासाठी प्रयत्न करणे हेच या लढ्याचे उद्दिष्ट आहे. निपाणीतील सर्व नागरिकांना, सामाजिक कार्यकर्त्यांना, विविध सामाजिक संघटनांना आणि समाजातील प्रत्येक संवेदनशील व्यक्तीला आमची नम्र विनंती आहे की, आपण या सामाजिक लढ्यात सहभागी व्हावे आणि उपोषणाला आपला जाहीर पाठिंबा द्यावा. उद्याची चांगली निपाणी घडवण्यासाठी आज आपली एकजूट आवश्यक आहे. नागरिकाचा आवाज लहान असेल, पण हजारो नागरिकांची एकजूट ही परिवर्तनाची ताकद असते.आपल्या शहराच्या विकासासाठी, आपल्या हक्कांसाठी आणि आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी लढा देणे आवश्यक असल्याचेही संघटनेने म्हंटले आहे.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *