Sunday , September 20 2026
Breaking News

बेळगाव

रेशनकार्डधारकांनो सावधान! ई-केवायसी नाही तर रेशन बंद!

  जिल्ह्यातील 18 लाख 59 हजार 786 सदस्य ई-केवायसीच्या प्रतीक्षेत; अन्न व नागरी पुरवठा विभागाची कडक भूमिका बेळगाव : रेशन वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासह मृत, स्थलांतरित आणि अपात्र लाभार्थ्यांची नावे शिधापत्रिकेतून वगळण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा अनिवार्य केली आहे. ई-केवायसीची मुदत संपलेल्या शिधापत्रिकांवरील सदस्यांना आता पुन्हा …

Read More »

मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे शालेय मंत्रिमंडळाची लोकशाही पद्धतीने निवडणूक संपन्न

  बेळगाव : येथील मराठी विद्यानिकेतन शाळेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची रुजवणूक व्हावी, नेतृत्वगुण विकसित व्हावेत, मतदानाचे महत्त्व समजावे आणि विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या उद्देशाने ईएलसी क्लब मराठी विद्यानिकेतन, बेळगाव येथे शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक दि.25 जुलै रोजी लोकशाही पद्धतीने उत्साहात पार पडली. निवडणुकीपूर्वी विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रिया, उमेदवारी, प्रचार, …

Read More »

एसआयआरला पुन्हा मुदतवाढ; अर्ज सादरीकरणासाठी १७ ऑगस्टपर्यंत संधी!

  मतदारांना मोठा दिलासा; दुसऱ्यांदा मुदतवाढीचा निर्णय; मसुदा यादी २४ ऑक्टोबरला, अंतिम यादी २७ ऑक्टोबरला बेळगाव : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनाच्या (एसआयआर) प्रक्रियेला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. एसआयआरअंतर्गत अर्ज स्वीकारणे, अर्ज भरणे आणि भरलेले अर्ज पुन्हा सादर करण्याची मुदत आता १७ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. राज्यात एसआयआर …

Read More »

रौडींविरोधात पोलिसांची धडक मोहीम; पाच जिल्ह्यांत १४८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

  बेळगाव : उत्तर कर्नाटकातील रौडींच्या वाढत्या कारवायांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी जुलै महिन्यात विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई केली. बेळगाव, विजयपूर, बागलकोट, धारवाड आणि गदग या पाच जिल्ह्यांत रौडींच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी ५३ विशेष पथके कार्यरत करण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान बीएनएसएसच्या कलम १२६, १२७, १२८ आणि १२९ अंतर्गत एकूण …

Read More »

लवकरच मंत्रिमंडळात महिलांना स्थान; मंत्री लक्ष्मण सवदी यांचे संकेत

  बेळगाव : कर्नाटक राज्य मंत्रिमंडळात लवकरच महिलांना मंत्रिपद देण्यात येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार याबाबत विचारविनिमय करत असल्याची माहिती मंत्री लक्ष्मण सवदी यांनी दिली. बेळगाव येथे शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सवदी म्हणाले की, दिल्लीतील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी जिल्ह्यातील सर्व काँग्रेस नेत्यांनी एकजुटीने काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. २०२८ …

Read More »

सेंट झेवियर्स, सेंट पॉल्स हायस्कूलला विजेतेपद

  बेळगाव : बेळगाव सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या व कॅन्टोन्मेंट बोर्ड उर्दू शाळा आयोजित कॅम्प विभागीय माध्यमिक आंतरशालेय मुला-मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत सेंट पॉल्स, सेंट झेवियर्स हायस्कूल संघानी आपापल्या प्रतिस्पर्धीय संघावर मात करत स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. मुलीं गटातील अंतिम सामन्यात सेंट झेवियर्स हायस्कूल संघाने तत्त वर्षाचा विजेता सेंट जोसेफ हायस्कूल …

Read More »

प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या; पत्नी व प्रियकर ताब्यात

  बेळगाव : अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने कट रचून खून केल्याची धक्कादायक घटना चिक्कोडी तालुक्यातील खडकळाट गावात उघडकीस आली आहे. सुमारे सहा महिन्यांपूर्वी घडलेल्या या हत्येचा प्रकार आता समोर आला असून, खडकळाट पोलिसांनी मृताच्या पत्नी बंगारी गावडे आणि तिचा प्रियकर रामा राणगे यांना ताब्यात घेऊन …

Read More »

शिवानंद नीलण्णवर यांच्या घरी सलग दुसऱ्या दिवशी ईडीची झाडाझडती

  बेळगाव : शिवम असोसिएट कंपनीचे मालक शिवानंद नीलण्णवर यांच्याविरोधातील कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या तपासात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बेळगावमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही शोधमोहीम सुरू ठेवली आहे. बेळगावातील शिवबसव नगर येथील एम.एच. टॉवरमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांकडून विविध कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. सीआरपीएफच्या जवानांच्या कडेकोट बंदोबस्तात ही कारवाई सुरू आहे. गोवा आणि …

Read More »

६ किलो ८५८ ग्रॅम गांजामिश्रित चॉकलेट जप्त, एकाला अटक

  उद्यमबाग पोलिसांची कारवाई बेळगाव : उद्यमबाग पोलिसांनी गांजामिश्रित अमली पदार्थांच्या चॉकलेट पाकिटांची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ६ किलो ८५८ ग्रॅम वजनाची गांजामिश्रित चॉकलेट पाकिटे तसेच मोबाईल, रोख रक्कम आणि स्कूटी असा एकूण ९४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोलू …

Read More »

के.एल.ई. संस्थेच्या लिंगराज महाविद्यालयात जिमखाना, असोसिएशन व क्लब उपक्रमांचा शुभारंभ

  बेळगांव : के.एल.ई. संस्थेच्या लिंगराज महाविद्यालय (स्वायत्त), बेळगावी येथे शैक्षणिक वर्ष २०२६–२७ मधील जिमखाना, असोसिएशन व क्लब उपक्रमांचा शुभारंभ महाविद्यालयाच्या केंद्रिय सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थी, प्राध्यापक व मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित या कार्यक्रमातून शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, क्रीडा तसेच विस्तार उपक्रमांच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना …

Read More »