








बेळगाव : सार्वजनिक गणेशोत्सव श्री एकदंत युवक मंडळ, एस.टी.एम. समर्थ नगर, बेळगाव यांच्या वतीने रविवार, दि. 20 सप्टेंबर रोजी श्रींच्या मंडपात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सायंकाळी ठीक 4 वाजता सत्यनारायण देवाची पूजा विधिवत पार पडली. त्यानंतर सायंकाळी 7 वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी गल्लीतील महिला मोठ्या संख्येने सहभागी होत आरती घेतली.
दरम्यान, कोनवाल गल्ली येथील गजराज भजनी मंडळाने आपल्या भक्तिमय सादरीकरणातून महाआरतीला विशेष रंगत आणली. भक्तिमय वातावरणात महाआरती संपन्न झाल्यानंतर महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाला विविध मान्यवर व प्रमुख पाहुणे उपस्थित होते. मंडळाच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत तब्बल २ हजार ५०० नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. गणरायाच्या दर्शनासाठी आलेल्या नागरिकांनी मंडळाच्या महाप्रसादाचे आणि आयोजनाचे कौतुक केले.
यावेळी गल्लीतील ज्येष्ठ नागरिक, महिला मंडळ तसेच युवक मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta