








बेळगाव – ऐतिहासिक तंजावर येथे २३ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या सरफोजीराजे भोसले द्वितीय मराठी साहित्य संमेलनासाठी बेळगावहून साहित्यिक व साहित्यप्रेमींचा सुमारे ३० जणांचा चमू सज्ज झाला आहे. साहित्य संमेलनासोबतच तंजावर परिसरातील ऐतिहासिक व पर्यटनस्थळांना भेट देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर यश ॲटो, बेळगाव येथे शुभेच्छा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी तंजावर संमेलनासाठी प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित साहित्यिक व साहित्यप्रेमींना सौ. रोशणी हुंद्रे व डॉ. संजीवनी खंडागळे यांनी पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रदेशाध्यक्ष सीमाकवी रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण, कार्याध्यक्ष महादेव चौगुले, ॲड. महेश कदम, मोहन मन्नोळकर, शशिकांत अष्टेकर, तानाजी पाटील व शिवसंत संजय मोरे यांच्यासह साहित्यिक व प्रतिनिधी उपस्थित होते.
रायगड व राजगड टीम २१ सप्टेंबरला रवाना
तंजावर साहित्य संमेलनासाठी रायगड व राजगड टीम २१ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता बेळगावहून तंजावरकडे रवाना होणार आहे.
रायगड टीममध्ये सीमाकवी रवींद्र पाटील, ॲड. सुधीर चव्हाण, विलास पवार, संजय गुरव, प्रा. रमेश भोसले, शिवाजी खांडेकर, सयाजीराव सावंत, कवी व्यं. कृ. पाटील, कवी रामदास बिर्जे, शिवसंत संजय मोरे, रघुनाथ पाटील, तानाजी पाटील, ॲड. महेश कदम, नारायण कणबरकर, मोहन पाटील सर, के. आर. मोटर, संदीप तरळे, शशिकांत अष्टेकर, नितीन आनंदाचे, रामलिंग देसाई, कृष्णा गवंडी, मोहन मन्नोळकर व मनोहर संताजी यांचा समावेश आहे.
राजगड टीममध्ये उद्योगपती महादेव चौगुले, उद्योगपती आप्पासाहेब गुरव, उद्योगपती टोपाणा पाटील, उद्योगपती अजित यादव, मारुती पाटील व महादेव चव्हाण सहभागी होणार आहेत.
तंजावरच्या साहित्य संमेलनात बेळगावची एकजूट आणि मराठी संस्कृतीची ओळख ठळकपणे दिसावी, यासाठी सहभागी सर्वांनी पांढरा कुडता व फेटा असा एकसारखा पोषाख परिधान करण्याचे ठरविण्यात आले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta