








निपाणी (वर्ता) : निपाणी येथील हिंदू मुस्लिम एकात्मतेचे प्रतीक असलेल्या संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित महान अवलि हजरत पिरानपीर दस्तगीर साहेब यांच्या उरुसाला प्रारंभ झाला आहे. त्यानिमित्त चव्हाण वाडा येथून चव्हाण वारस, माजी सभापती बाळासाहेब देसाई -सरकार आणि मानकरी यांच्या हस्ते तुरबतीर चुना लेपन करण्यासाठी मिसवणुकीने दर्गाहकडे रवाना करणयात आला. चव्हाणवाडा, जिजामाता चौक, रावण गल्ली, भाट गल्लीमार्गे दर्गा येथे लेपन करण्यासाठी चुना नेण्यात आला. यावेळी बाळासाहेब देसाई -सरकार, पृथ्वीराज चव्हाण व्हाण, संग्रामसिंह देसाई, रणजितसिंह देसाई, शरद मळगे, सुजीत गायकवाड, सुहास किल्लेदार, योगेश शहाहा, कृष्णा पिसे, सेवेकरी निसार मुजावर, वासीम मुजावर, जहीर मुजावर, शकील मुजावर, समीर मुजावर उपस्थित होते.
मंगळवारी (ता.२२) संदव उरुस होणार आहे. त्यानंतर मिरवणुकीने मानाचे गलेफ घालण्यात येणार आहेत. या दिवशी भर ताजा उरूस होणार आहे. गुरुवारी (ता.२४) शिळा उरूस होणार आहे.सकाळी ७ वाजल्यापासून जिजामाता चौकातील चव्हाण वाड्यात खारीक व उदीचा कार्यक्रम होणार आहे. शुक्रवारी (ता.२५) मानाच्या फकीरांची स्वानगी व भंडारखाना होईल रविवारी (ता.२७) पाकळी कार्यक्रमाने पुरुषाची सांगता होणार आहे.

Belgaum Varta Belgaum Varta