Monday , September 21 2026
Breaking News

श्री एकदंत युवक मंडळाच्या मंडपासमोर रंगली मंगळागौर

Spread the love

 

महिलांचा उत्स्फूर्त सहभाग; पारंपरिक खेळांनी परिसरात उत्साह

बेळगाव : एसटीएम समर्थनगर येथील श्री एकदंत युवक मंडळाच्या वतीने आयोजित सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त श्रींच्या मंडपासमोर श्री दुर्गाशक्ती महिला मंडळाच्या वतीने भव्य मंगळागौर कार्यक्रम उत्साहात पार पडला. पारंपरिक मंगळागौरीच्या खेळांनी आणि महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

लहान मुलींपासून महाविद्यालयीन तरुणी तसेच विविध वयोगटातील महिलांनी कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. महिलांनी फुगडी, झिम्मा यांसह मंगळागौरीचे विविध पारंपरिक खेळ व प्रकार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या आकर्षक सादरीकरणाला नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

कार्यक्रमाला गल्लीतील महिला, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्कृष्ट सहभाग व सादरीकरण करणाऱ्या महिलांचे कौतुक करून त्यांना रोख पारितोषिक देत प्रोत्साहन देण्यात आले.

मंगळागौरीच्या माध्यमातून गणेशोत्सवात पारंपरिक सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडल्याने उपस्थितांनी श्री दुर्गाशक्ती महिला मंडळाच्या सदस्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या समारोपावेळी ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.

About Belgaum Varta

Check Also

अनावश्यक निर्बंध लादणार नाही; वेळेत गणेश विसर्जन पूर्ण करा : पोलीस आयुक्त प्रकाश निकम

Spread the love  बेळगाव : ऐतिहासिक बेळगाव गणेशोत्सवाच्या अंतिम चार दिवसांतील मिरवणूक व गणेशमूर्ती विसर्जन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *